हर्णे बंदराचा कायापालट होणार-बंदरे विकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार

  हर्णे बंदराचा होणार कायापालट : बंदरे विकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार


मुंबई:रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील हर्णे बंदराचा लवकरच कायापालट होणार आहे. तसेच अंजर्ला येथे ग्रायन्स पद्धतीचा बंधारा बांधण्यासाठी अर्थसंकल्पात निधीची तरतूद लवकरच करण्यात येणार असल्याची ग्वाही बंदरे विकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली. मुंबई येथील त्यांच्या दालनात गुरुवारी झालेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार योगेश कदम, महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील, अधीक्षक अभियंता सुधीर देवरे, नियोजन अधिकारी बढीए तसेच मच्छीमार संघटनेचे सोमनाथ पावशे, हेमंत चोगले, बाळकृष्ण पावशे, दत्ताराम पेढेकर, पीएन चोगले, काशिनाथ पावशे, गोपीचंद चोगले आदी उपस्थित होते.





.........................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256  / 9529501121


Comments