केंद्रिय मंत्री मा.ना.डॉ. रामदासजी आठवले साहेबांचा सांगली जिल्हा दौरा उत्साहात संपन्न

 मिरज:- (आशितोष माने) रिपब्लिकन पार्टी आँफ इंडिया चे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रिय सामाजिक न्याय व सबलीकरण राज्यमंत्री मा.ना.डॉ. रामदासजी आठवले साहेब आज रविवार दि. १४ मार्च रोजी सांगली जिह्याच्या दौर्यावर होते.

राजश्री शाहू शिक्षण संस्था, मौजे ईनाम धामणी ता. मिरज चे संस्थापक अध्यक्ष मा. विठ्ठलकाका पाटील यांच्या ६१ वा वाढदिवसाच्या निमित्त आयोजित कायक्रमात मा.ना. आठवले साहेब उपस्थित राहून मा. विठ्ठलकाका पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

तत्पुर्वी मौजे धामणी येथील अराद्य दैवत ह. मिरासाहेब यांच्या दर्ग्यास भेट देऊन मा.डॉ. रामदासजी आठवले साहेबांच्या हस्ते गलेफ अर्पण करण्यात आला.यानंतर सांगली येथील कच्छी हॉल येथे राजश्री शाहू महाराज संस्था इनाम धामणी आयोजित राजमाता जिजाऊ आदर्श आई पुरस्कार-२०२१* या कार्यक्रमात समारंभाचे अध्यक्ष म्हणून मा.ना.डॉ. आठवले साहेब निमंत्रीत होते.आदर्श आई पुरस्कार-२०२१ कार्यक्रमाच्या सुरवातीस सर्व महापुरूषांच्या प्रतिमेला दिपप्रज्वलन करून व पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरवात करणेत आली._*

प्रथम कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवरांचे शॉल,सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देवून सत्कार करणेत आला.

कार्यक्रमाचे प्रास्तविक राजश्री शाहू शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. विठ्ठलकाका पाटील यांनी केले.

यानंतर सांगली जिल्ह्यातील आदर्शमाता म्हणून सन्मानीत करणेत येणार्या १२ आदर्श मातांचा शॉल,पुष्पगुच्छ,सन्मान चिन्ह व झाडे लावा झाडे जगवा ही संकल्पना लक्षात घेऊन छोटी रोपे देवून सन्मानीत करणेत आले.

यावेळी उपस्थित जनसमुदायास मार्गदर्शन करताना मा.ना. आठवले साहेब म्हणाले विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणाचे महत्व ओळखून स्वतः उच्च शिक्षण घेऊन समाजातील जनतेला शिक्षणाचे महत्व पटवून सांगितले. आपल्याकडे जर जर दोन रूपये असतील तर त्यातील एक रूपयाचे पुस्तक विकत घ्यावे व ते वाचून सुशिक्षित व सुसंस्कृत समाज घडवण्याचा प्रयत्न करावा असा कानमंत्र डॉ. आंबेडकरांनी आपणास दिला. याच पद्धतीने आज आदर्श आई या पुरस्काराने सन्मानीत झालेल्या माझ्या माता यांनी किती अडचणीचे दिवस पाहिले असतील ह्याची जाणीव मला असुन माझ्या आईने देखील अशेच कठोर परिश्रम करून मला सुशिक्षित केल आहे. सन्मानीत मातांनी  मुलं सुशिक्षित करण्यासाठी घेतलेले कष्टाचे फळ हे त्यांना मिळाले आहे. आज या मातांची मुले मोठमोठ्या हुद्यावर काम करत आहेत. यावेळी मा. विठ्ठलकाका पाटील यांना खास ना.आठवले साहेबांच्या शैलीने वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा. नानाभाऊ पाटोळे, रिपाइं चे महाराष्ट्र प्रदेश सचिव तथा मा. महापौर व विद्यमान नगरसेवक मा. विवेकरावजी कांबळे साहेब, आमदार श्रीमती सुमनताई पाटील, मा. आमदार अनिल बाबर, भाजप चे ग्रामीण जिल्हाध्यक्ष मा. दिपकबाबा शिंदे, वसंतदादा शेतकरी कारखान्याचे संचालक मा. विशाल पाटील, सां.मि.कु. शहर महानगरपालिकेचे महापौर मा. दिग्वीजय सुर्यवंशी, सांगली जि.प.च्या अध्यक्षा मा. सौ. प्राजक्ता कोरे, सां.मि.कु.चे उपमहापौर मा. उमेश पाटील यांचे सह आदी मान्यवर उपस्थित होते.सांगली सर्कीट हाऊस येथे केंद्रिय मंत्री मा.ना.डॉ. रामदासजी आठवले साहेबांनी रिपाइं सांगली जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकार्यांची भेट घेऊन विवीध विषयावर चर्चा करून मार्गदर्शन केले व सायं. ०५-३० वा. कवलापूर ता. मिरज येथील विमानतळावरून हॕलिकॉप्टरमार्गे पुण्यास रवाना झाले.यावेळी रिपाइं(आठवले) चेपश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष मा.प्रा. शहाजी कांबळे, पश्चिम महाराष्ट्र सरचिटनीस व विद्यमान नगरसेवक मा. जगन्नाथदादा ठोकळे, विभागीय सांगली जिल्हाध्यक्ष मा. संजय कांबळे, मा. राजेश तिरमारे, युवक सांगली जिल्हाध्यक्ष मा. अशोकरावजी कांबळे, युवानेते मा. श्वेतपद्म कांबळे, सांगली लोकसभा क्षेत्र अध्यक्ष मा. संदेश भंडारे, महिला सांगली जिल्हाध्यक्षा मा. छायादीदी सर्वदे, आय.टी. सेलचे सांगली जिल्हाध्यक्ष मा. योगेंद्रभाऊ कांबळे, यांचे सह सांगली कोहापूर जिह्यातील सर्व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.




...............................
2.5 लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते
24x7 
www.freshnewz.in
freshnewskop24@gmail.com

Freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी    पत्रकार होण्यासाठी  कॉल करा 

9529501121

 


टिप्पण्या