खेडमध्ये महिलेची रॉकेलने पेटवून घेऊन आत्महत्या



 खेडमध्ये महिलेची रॉकेलने पेटवून घेऊन आत्महत्या



 खेड : अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतल्याने गंभीर जखमी झालेल्या सनगरवाडी येथे राहणाऱ्या सौ. भारती रामचंद्र झोरे यांचा  उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. याबाबत बाबू जानू झोरे यांनी खबर दिली आहे. ते आपल्या नातीला घेऊन घराबाहेर गेले होते. त्यावेळी त्यांची सून भारती ही घरात एकटीच होती. अचानक त्यांना घरातून धूर येताना व सुनेच्या किंकाळी मारण्याचा आवाज ऐकू आला. घराला आतून कड्या लावल्याने ते घराची कौले काढून आत गेले असता त्यांच्या सुनेने अंगावर रॉकेल ओतून घेऊन स्वतःला जाळून घेतल्याचे दिसले. त्यांनी घोंगडीच्या साहाय्याने ही आग विझविण्याचा प्रयत्न केला. या प्रकारात भारती ही ९५ टक्के भाजून गंभीर जखमी झाली होती. तिच्यावर रत्नागिरी शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला.




........................................

२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256  / 952950112


टिप्पण्या