अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणी तरुणाला अटक



 अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणी तरुणाला अटक 


लांजा:- शाळेत जाणाऱ्या अल्पवयीन मुलीला रस्त्यात गाठून विनयभंग करणाऱ्या ३५ वर्षीय तरुणाला लांजा पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात येत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहिती अशी, बुधवारी नववीमध्ये शिकणारी मुलगी शाळेत जात असताना सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास शिपोशी येथील अरुण दत्ताराम सुतार याने तिचा विनयभंग केला. तिने आरडाओरडा केल्यानंतर हा तरुण तेथून पळून गेला. पीडित मुलीने घरी जाऊन हा प्रकार आईवडिलांना सांगितला. त्यानंतर बुधवारी रात्री मुलीच्या तालुका विधि समितीच्या सदस्य स्वप्ना सावंत यांची भेट घेऊन घडलेल्या प्रकाराची माहिती घेली. त्यानंतर याप्रकरणी लांजा पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली.पोलिसांनी संशयित अरुण सुतार याला अटक केली आहे. याबाबत अधिक तपास लांजा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल गंभीर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक श्वेता पाटील करीत आहेत.



........................................

२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256  / 9529501121

Comments