*बेशुद्धावस्थेत आढळलेल्या तरुणीचा मृत्यू*
रत्नागिरी : तालुक्यातील निवळी येथील माहेर संस्थेत बेशुद्ध अवस्थेत आढळलेल्या तरुणीचा मृत्यू झाला. याप्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.ही घटना गुरुवार ११ मार्च रोजी सकाळी ५.२० वा.सुमारस घडली. सुरेखा तुकाराम कासारे (२५, रा.लाटवण मंडणगड, रत्नागिरी) असे मृत्यू झालेल्या तरुणीचे नाव आहे. याबाबत माहेर संस्थेचे काळजीवाहक सुनील पुंडलिक कांबळे (३७, रा. माहेर संस्था, निवळी, रत्नागिरी) यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात खबर दिली. त्यानुसार गुरुवारी सकाळी कांबळे यांना सुरेखा कासारे माहेर संस्थेत बेशुद्ध अवस्थेत आढळून आल्यावर त्यांनी तातडीने तिला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय सुत्रांनी तिला तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी अधिक तपास ग्रामीण पोलिस करत आहेत.
........................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256 / 9529501121
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा