हिंदी सिनेसृष्टीतले इतर सर्व व्यवहार, उलाढाली पारदर्शक आहेत का?- शिवसेनेचा सवाल
- 'धाडी टाकण्यासाठी तापसी पन्नू, अनुराग कश्यपचीच निवड का?
- तापसी पन्नू व अनुराग कश्यपसह निवडक कलाकारांवरील कारवाईवरून राजकारण
- शिवसेनेची केंद्रातील सरकारवर जोरदार टीका
मुंबई:'देशात सध्या सर्वच प्रकारच्या स्वातंत्र्याचं हवन होत आहे. त्यात केंद्रीय तपास यंत्रणांचे निःपक्ष काम करण्याचं स्वातंत्र्यही जळून गेलं आहे. अभिनेत्री तापसी पन्नू व अनुराग कश्यप प्रकरणातही तेच घडलं आहे,' अशा शब्दांत शिवसेनेनं केंद्रातील मोदी सरकारवर टीकेची तोफ डागली आहे. छापे टाकण्यासाठी सरकारनं नेमकी याच लोकांची निवड का केली गेली?,' असा प्रश्नही शिवसेनेनं उपस्थित केला आहे.
क्लिक करा आणि वाचा:रत्नागिरी व देश विदेशातील ताज्या बातम्या
तापसी पन्नू, निर्माता दिग्दर्शक अनुराग कश्यप यांच्या घरावर आयकर विभागानं छापे टाकले आहेत. २०११ च्या करचुकवेगिरीच्या प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे. निर्माता विकास बहल, सिने वितरक मधू मँटेना यांच्यावरही कारवाई सुरू आहे. या मुद्द्यावरून शिवसेनेनं 'सामना'च्या अग्रलेखातून मोदी सरकारवर दुटप्पीपणाचा आरोप केला आहे. सरकारविरोधात भूमिका घेतल्याची किंमत बॉलिवूडमधील काही मंडळींना चुकवावी लागत आहे, असं शिवसेनेनं म्हटलं आहे. 'तापसी व अनुराग वगळता हिंदी सिनेसृष्टीतले इतर सर्व व्यवहार, उलाढाली स्वच्छ आणि पारदर्शक आहेत का,' असा प्रश्न शिवसेनेनं केला आहे.
क्लिक करा आणि वाचा:भगवती किल्यावरुन पडलेल्या तरुणीने आत्महत्ये आधी केली होती इंस्टाग्रामवर भावनिक पोस्ट
ज्याअर्थी इन्कम टॅक्सने धाडी घातल्या, त्याअर्थी कुठे तरी गडबड आहेच, पण धाडी घालण्यासाठी किंवा कारवाई करण्यासाठी फक्त याच लोकांची का निवड केली? ‘बॉलीवूड’मध्ये रोजच्या रोज होणारी कोटीच्या कोटी उड्डाणे गंगाजलाच्या प्रवाहातून वर येतात काय?मुळात ‘बॉलिवूड’ हे लॉक डाऊन काळात प्रचंड अडचणीत आहे. चित्रीकरण, नव्या निर्मिती बंद आहेत. सिनेमागृहे बंद आहेत. एक मोठा उद्योग व्यवसाय आर्थिक संकटात सापडला असताना त्यावर राजकीय सूडबुद्धीने असे हल्ले करणे योग्य नाही.
क्लिक करा आणि वाचा:रत्नागिरी-फायरिंगप्रकरणी पोलिसांनी बंदूक केली जप्त
मोदी सरकारची उघड चमचेगिरी करणारे कित्येकजण सिनेसृष्टीत आहेत. त्यातले अनेकजण तर मोदी सरकारचे सरळ लाभार्थीच आहेत. त्या सगळ्यांचे व्यवहार आणि उलाढाली धुतल्या तांदळाप्रमाणे स्वच्छ आहेत काय?भाजप आणि केंद्र सरकारच्या धोरणांवर टीका केल्यामुळे कारवाई होत असल्याचे आरोप माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी फेटाळले आहेत. तपास यंत्रणांकडे जी खात्रीशीर माहिती येते त्याआधारे कारवाई केली जाते, अशी ‘दिव्य’ माहिती जावडेकरांनी दिली आहे. म्हणजे बॉलीवूडमधील भलेबुरे धंदे जणू समस्त देशवासीयांना माहीतच नव्हते असे कंद्रीय मंत्र्यांना म्हणायचे आहे काय?
क्लिक करा आणि वाचा:रत्नागिरीत अनेकांची फेसबुक अकाऊंट हॅक
दीपिका पदुकोणने ‘जेएनयू’मध्ये जाऊन तेथील विद्यार्थ्यांची भेट घेताच तिच्या बाबतीतही छुपे आंदोलन, बहिष्काराचे हत्यार चालविण्यात आले. दीपिकाचे चित्रपट ठरवून पाडण्याचे प्रयोग झाले. तिच्याविरुद्ध सोशल मीडियावर घाणेरड्या मोहिमादेखील राबविण्यात आल्या. अशा कृतीतून देशाची प्रतिष्ठा नक्कीच वाढत नाही.पर्यावरणवादी कार्यकर्ती दिशा रवीला ज्या घृणास्पद पद्धतीने अटक केली त्यावर जगभरात मोदी सरकारवर टीका झाली. यात देशाचीच बेइज्जती होत असते. गोमांस प्रकरणात झुंड-बळी गेले, पण भाजपशासित राज्यांत गोमांस विक्री जोरात सुरूच आहे. यावर कोणीच कसे बोलायचे नाही?
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256 / 9529501121


Comments
Post a Comment