*मोठी बातमी! उद्धव ठाकरे म्हणाले, एक-दोन दिवसांत लॉकडाऊनबाबत निर्णय*

 मोठी बातमी! उद्धव ठाकरे म्हणाले, एक-दोन दिवसांत लॉकडाऊनबाबत निर्णय




हायलाइट्स:

राज्यातील काही भागांत पुन्हा लॉकडाऊनची शक्यता

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वत: दिले संकेत

एक दोन दिवसांत होणार अंतिम निर्णय


मुंबई: करोना वाढत्या रुग्णसंख्येमुळं काही शहरांमध्ये निर्बंध लादले जात असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोठी बातमी दिली आहे. राज्यात काही ठिकाणी नाईलाजाने लॉकडाऊन करावा लागेल, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. पुढच्या एक-दोन दिवसांत याबाबत निर्णय घेतला जाईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं. 


राज्यभरात करोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. काही दिवसांपूर्वी १० हजारच्या आत असलेल्या रुग्णसंख्येनं बुधवारी थेट १३ हजारांचा टप्पा ओलांडला. त्यामुळं चिंता वाढली आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांनी याच पार्श्वभूमीवर कठोर निर्णय घेण्याचे संकेत दिले आहेत. मुंबईतील जे जे रुग्णालयात करोनाची लस घेतल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. 'लसीकरणाचा वेग वाढवण्याचा आपला प्रयत्न आहे, पण कदाचित काही दिवसांत काही ठिकाणी लॉकडाऊन करावा लागेल. एक दोन दिवसांत आम्ही याबाबत निर्णय घेणार आहोत. जिथं करोनाचा प्रादूर्भाव अधिक आहे, तिथं लॉकडाऊनचे पाऊल उचलावेच लागेल, असं ते म्हणाले.


........................................

२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256  / 9529501121




Comments