स्वस्तात मस्त असलेल्या तुरटीचे फायदे जाणून घ्या, थक्क व्हाल!
मुंबई : बाजारात अगदी स्वस्त मिळणाऱ्या काही गोष्टी असतात ज्यांचा आपल्या जीवनात खूप फायदा होऊ शकतो. यातली एक गोष्ट म्हणजे तुरटी. दिसायला एखाद्या पांढऱ्या दगडाप्रमाणे असणारी तुरटी खूपच गुणकारी आहे. आज आपण या स्वस्तात मस्त असलेल्या तुरटीचे फायदे काय काय आहेत ते जाणून घेऊयात... आपण ऐकून असतो किंवा साधारणपणे तुरटीचा वापर हा पाणी शुद्ध करण्यासाठी केला जातो. पाण्यात तुरटी घुसळली की पाण्यातील घाण, गाळ तळाला जातो. याबरोबरच तुरटीचे अन्य अनेक फायदे आहेत. त्वचा आणि आरोग्यासाठी तुरटी एका अँटिसेप्टिकप्रमाणे काम करते. यामध्ये अनेक औषधीय गुण आहेत.
पाणी स्वच्छ करण्यासाठी तुरटी त्यातून फिरवावी
त्वचेला दुर्गंधी येत असेल तर पाण्यातून तुरटी फिरवून त्या पाण्याने आंघोळ करावी अथवा गरम पाण्यात तुरटीची पावडर मिक्स करावी
दातांची समस्या असेल तर तुरटीच्या पाण्याने रोज चूळ भरावी
चेहऱ्यावर मुरूमं असतील तर तुम्ही चेहरा ओला करून त्यावर रोज तुरटीचा तुकडा फिरवावा यामुळे मुरूमं जाण्यास मदत होते
खोकल्यासाठीही याचा उपयोग होतो पण त्याआधी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे
ऊवा घालवण्यासाठी तुरटीच्या पावडरमध्ये थोडे पाणी मिक्स करून पेस्ट करून घ्या आणि ही पेस्ट केसांना स्काल्पपासून लावा. ऊवा मरतात
मांसपेशींचा त्रास असल्यास, हळद आणि तुरटी पावडर मिक्स करून आखडलेल्या ठिकाणी लावा. त्यामुळे मांसपेशींचा त्रास कमी होतो
...............................
2.5 लाख हून अधिक वाचक
600+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewskop24@gmail.com
Freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा
9529501121

Comments
Post a Comment