*कै. सौ. अनसुया आनंदी महिला वृद्धाश्रम पावस येथे महिलांनी महिलांसाठी केलेला महिला दिन*

*कै. सौ. अनसुया आनंदी महिला वृद्धाश्रम पावस येथे महिलांनी महिलांसाठी केलेला महिला दिन* 



पावस।प्रतिनिधी

पावस येथे मंगला सोमणी यांनी स्वामी स्वरूपानंद यांच्या आशिर्वादाने 1995 साली महिलांसाठी वृद्धाश्रम सुरू केला. त्या आश्रमासाठी त्यांनी आपल्या आईचे व सासुबाईंचे नाव देण्याचे ठरविले व नवीन वास्तू घेऊन त्याला आपल्या दिवंगत मुलगी ज्योतीचे नाव दिले. अशाप्रकारे महिलांसाठी सुरू केलेल्या वृद्धाश्रमाला यंदा 25 वर्षे पूर्ण झाली. 


महिला दिनाचे औचित्य साधून पावस येथील तरुण महिला किर्तनकार सौ. स्पृहा संकेत चक्रदेव यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्या राष्ट्रीय किर्तनकार चारुदत्त आफळे बुवा यांच्या शिष्या आहेत. त्यांनी विषयासाठी 'मनुष्यजन्माचे करावे सार्थक...' हा नामदेव महाराजांचा अभंग घेऊन पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे आख्यान केले. त्यांना तबलासाथ संकेत संजय चक्रदेव व विश्वास जोशी यांनी हार्मोनियमवर साथ संगत केली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. सरिता सदानंद देसाई यांनी केले. 


या कार्यक्रमाला अकल्पिता सुकांत चक्रदेव, चेतना चंद्रकांत खातू ,कीर्ती केदार पटवर्धन, अरुणा कदम,वृंदा विलास बर्वे, शारदा चव्हाण, सौ. नैकर व ज्योती सळपे तसेच आश्रमातील सर्वांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाची सांगता अपूर्वा मराठे यांच्या आभार प्रदर्शनाने झाली.


........................................

२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256  / 9529501121




Comments