स्व. केदार पाटील यांच्या ८व्या पुण्यतिथी निमित्त आयोजित रक्तदान शिबिरात ८६ जणांचे रक्तदान...


पन्हाळा - (प्रतिनिधी) कोडोली  येथील वारणेचा वाघ फौंडेशनच्या वतीने स्व. केदार पाटील यांच्या आठव्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात ८६ रक्तदात्यांनी रक्तदान केले. रक्तदान शिबिराचे हे आठवे वर्ष होते.

या शिबिरातील रक्तदात्यांचे प्रमाणपत्राचे वाटप हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे भाजप-जनसुराज्य चे नेते व जिल्हा परिषद सदस्य दलितमित्र डॉ अशोकराव माने(बापू) यांच्या हस्ते झाले,कोरोना च्या पार्श्वभूमीवर कोडोली येथील हौसिंग सोसायटीच्या प्रशस्त सांस्कृतिक भवन येथे रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. वारणेचा वाघ फौंडेशनचे संस्थापक पी. डी. पाटिल यांनी स्व. केदार पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन केल्यानंतर रक्तदान शिबिरास सुरुवात झाली. या प्रसंगी वारणेचा वाघ फौंडेशनचे अध्यक्ष व पन्हाळा अर्बन निधी चे चेअरमन प्रवीण पाटील, समाधान पाटील,प्रथमेश पाटील, विजय पाटील, पन्हाळा अर्बन निधी चे संचालक राजकुमार जाधव, जयसिंग पाटील, सौ प्रणाली पाटील, सौ. प्रमिला पाटील, सौ प्राजक्ता पाटील, सतीश पाटील उपस्थित होते.

यावेळी रक्तदान शिबिरा बरोबरच रक्तातील कॅन्सर व थायरॉईड तपासणीचे मोफत शिबिर तसेच गरजू विद्यार्थ्यांना वह्या वाटप असे उपक्रम राबविण्यात आले. कोडोली एमडीएच महालॅब यांचे वतीने रक्तातील कॅन्सर व थायरॉईड तपासणी करण्यात आली. पन्हाळा पंचायत समितीचे माजी सभापती रवींद्र जाधव यांच्या हस्ते गरजू मुलींना वह्या वाटप करण्यात आले.




...............................
2.5 लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते
24x7 
www.freshnewz.in
freshnewskop24@gmail.com

Freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी    पत्रकार होण्यासाठी  कॉल करा 

9529501121


टिप्पण्या