जैतापूर परिसरात उडाली खळबळ. जैतापूर येथे ४५ वर्षिय व्यक्ती गळफास लावलेल्या स्थितीत सडलेल्या, कुजलेल्या अवस्थेत आढळून आली

 जैतापूर येथे ४५ वर्षिय व्यक्ती गळफास लावलेल्या स्थितीत सडलेल्या, कुजलेल्या अवस्थेत आढळून आली


जैतापूर परिसरात उडाली खळबळ


रत्नागिरी प्रतिनिधी:-

राजापूर तालुक्यातील जैतापूर येथे राजेश उर्फ राजेंद्र नारकर (४५) आपल्या राहत्या घरातील वापरात नसलेल्या स्वयंपाक घरात गळफास लावून सडलेल्या, कुजलेल्या अवस्थेत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. ही घटना सोमवार दिनांक ८ मार्च रोजी सायंकाळी साडेचार वाजण्यापूर्वी घडली आहे. हकीकत अशी की यातील मयत व्यक्ती राजेश उर्फ राजेंद्र नारकर हा गेली काही महिने मानसिक दबावाखाली होता. तो कामधंदा काहीही करत नव्हता. मागिल वीस ते बावीस दिवसांपासून दारुच्या नशेत कुठेतरी बाहेर निघुन गेला होता. खबरदार संदेश दीनानाथ पाथरे यांची पत्नी मयत यांची बहिण असून घराची साफसफाई करत असताना घरातील वापरात नसलेल्या स्वयंपाक घरात गळफास लावलेल्या स्थितीत सडलेल्या कुजलेल्या अवस्थेत आढळून आला. सदर घटनेमुळे जैतापूर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेचा तपास नाटे पोलिस स्थानकाचे पोलिस हवालदार विकास चव्हाण करित आहेत. या घटनेची नोंद नाटे पोलिस स्थानकात आमृ रजिस्टर मध्ये करण्यात आली आहे.


.........................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256  / 9529501121

Comments