महिलांसाठी बनवण्यात आलेले ‘हे’ पाच कायदे सर्वांना माहीत असायलाच हवेत
महिलादिन विशेष! महिलांसाठी बनवण्यात आलेले ‘हे’ पाच कायदे सर्वांना माहीत असायलाच हवेत; पाच नंबरचा कायदा तर खूप आहे महत्वाचा
प्रत्येक क्षेत्रात आज महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. भारतातील अनेक महिलांनी आपल्या देशाचे, गावचे नाव अभिमानाने उंच शिखरावरती नेऊन ठेवले आहे.
मात्र असे जरी असले तरी देखील आजही काही समाज महिलांकडे दुय्यम नजरेने बघतो. तर अनेक ठिकाणी महिला सध्या डॅशिंग होत चालल्या आहेत असे म्हणले जाते. मात्र दुसरीकडे महिलांवरचे बलात्कार, अन्याय अत्याचार थांबण्याचे नाव घेत नाही.
अनेकवेळा महिला हे अन्याय अत्याचार निमूटपणे सहन करतात. तर अनेक महिलांना आपल्यासाठी नक्की काय कायदे-कानून आहेत हेच माहीत नसते.
मात्र आजच्या लेखात आज आपण हेच महिलांविषयी बनवण्यात आलेले कायदे पाहणार आहोत.
१) रात्रीच्यावेळी महिलांना अटक न करण्याचा अधिकार:- या कायद्यानुसार सूर्यास्तानंतर कोणताही पोलिस कोणत्याही महिलेस अटक करू शकत नाही.
२) समान वेतन अधिकार:- भारतीय कामगार कायद्यानुसार, कोणत्याही ठिकाणी काम करताना पगाराच्या वेळी लिंगाच्या आधारावर भेदभाव केला जाऊ शकत नाही. असे केल्यास कोणतीही महिला संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करू शकते.
३) कामावर छळ होण्याच्या विरोधातील अधिकार:- जर एखाद्या कामाच्या ठिकाणी कोणत्याही महिलेवर लैंगिक छळ होत असेल, तर संबंधित व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचा महिलांना पुरेपूर अधिकार असतो.
४) मातृत्व संबंधी अधिकार:- जेव्हा एखादी महिला गर्भवती असते, तेव्हा तिला २६ आठवड्यांची सुट्टी घेण्याचा अधिकार आहे. या कालावधीत महिलेच्या पगारामध्ये कोणतीही कपात केली जात नाही. आणि ती महिला पुन्हा काम रुजू होऊ शकते.
५) घरगुती हिंसाचार अधिकार:- या कायद्याअंतर्गत महिलेच्या घरी किंवा सासरच्यांनी तिच्यावर काही हिंसाचार केला असेल तर ती महिला त्याविरूद्ध गुन्हा दाखल करू शकते.
तर हे पाच कायदे महिलांसाठी बनवण्यात आले असून, जर कोणत्याही महिलेला वरील पैकी कोणती अडचण किंवा त्रास जाणवत असल्यास आपणही लगेचच या कायद्या अंतर्गत पोलीस स्टेशनमध्ये धाव घेऊ शकता.
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256 / 9529501121


Comments
Post a Comment