लॉकडाऊनच्या काळातील वीजबिल माफ करावे यासाठी कोल्हापूर पंचगंगा पुलावर चक्काजाम आंदोलन

(छाया - तय्यब अली)

कोल्हापूर :- (प्रतिनिधी) राष्ट्रीय महामार्गावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी, वीजतज्ञ प्रताप होगाडे तसेच यांच्या नेतृत्वाखाली व प्रा.एन.डी.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. कोरना काळातील वीजबिल माफ करावे. या मागणीसाठी कोल्हापूर जिल्ह्यात आंदोलन सुरू आहे. यापूर्वीही अनेक आंदोलने करण्यात आली. शासनाने वीजबिल माफ करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र त्याची अद्याप पूर्तता केलेली नाही. यामुळे आज राष्ट्रीय महामार्ग रोखण्याचा इशारा देण्यात आला होता. त्यानुसार आज कोल्हापुरात ज्येष्ठ नेते एन डी पाटील यांचे मार्गदर्शनाखाली आंदोलन करण्यात आले बिल न भरणाऱ्या ग्राहकांचे वीज कनेक्शन तोडू नका, सर्वसामान्य ग्राहकांना दिलासा द्यावा. वीज बिल माफ करेपर्यंत गप्प बसणार नाही. जबरदस्ती वीज बिल वसूल कराल, तर आम्ही कायदा हातात घेऊ. असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी यावेळी दिला या आंदोलनामुळे महामार्गावर वाहतूक बराच काळ खोळंबली होती तसंच वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.


यावेळी पोलिसांनी परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून आंदोलक मा.राजू शेट्टीसह इतर आंदोलकांना यावेळी अटक केली. यावेळी काही काळ तणावाचे वातावरण होते.  काही आंदोलक तर रस्त्यावरच झोपून गाड्यांच्या आडवे झोपून शासनाचा निषेध करत होते. 



...............................

2.5 लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते
24x7 
www.freshnewz.in
freshnewskop24@gmail.com

Freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी    पत्रकार होण्यासाठी  कॉल करा 

9529501121






 

टिप्पण्या