*झुंडीने सापडणाऱ्या जेलिफिशचे संकट*
झुंडीने सापडणाऱ्या जेलिफिशचे संकट
रत्नागिरी।प्रतिनिधी
मच्छीमारांना मासे चांगल्या प्रमाणात मिळत असताना मच्छीमारांपुढे एक नवे संकट उभे ठाकले आहे. मासेमारीसाठी पाण्यात टाकलेल्या जाळ्यात झुंडीने जेलिफिश सापडत असल्याने मच्छीमार धास्तावले आहेत. खोल समुद्रात असणारे जेलिफिश काहीवेळा किनारपट्टी भागातही आढळून येतात. रत्नागिरी शहराजवळ भाट्ये किनारीही काही प्रमाणात जेलिफिश आढळून येतआहेत.
किनाऱ्यावरील वाळूत हे जेलिफिश दिसून येत आहेत. समुद्रात हेलकावे घेणाऱ्या छत्रीच्या आकाराचे जेलिफिश आकर्षक दिसत असले तरी त्यातील काही प्रजाती मच्छीमाराला जखमी करू शकतात. गेल्या काही वर्षांत जेलिफिशच्या डंखामुळे मच्छीमार जखमी झाल्याच्या घटना अनके ठिकाणी घडल्या आहेत. समुद्रकिनारपट्टी परिसरात साधारण तीन प्रकारच्या जेलिफिश आढळतात. ठराविक मोसमात हे जेलिफिश किनाऱ्यालगत येतात. पावसाळ्याआधी 'ब्लू - बटन' पावसाळ्यात 'ब्लू - बॉटल' आणि पाऊस ओसरल्यावर 'बॉक्स' जेलिफिश किनाऱ्यालगत येतात.
वजनाने हलक्या असल्याने वाऱ्याच्या दिशेने हेलकावे खात ,ते समुद्रकिनारी पोहोचतात. मोठ्या जेलिफिशचे शरीर १० इंच आकाराचे आणि दोरीसारखे २ फूट लांबीचे पाय असतात.
जेलिफिशचा एखाद्याला डंख झाल्यास त्या ठिकाणी लाल रंगाचे व्रण उठतात. तसेच त्या व्यक्तीला असह्य वेदना होतात. समुद्रात टाकलेली जाळी बोटीत घेताना त्यामध्ये अडकलेले जेलिफिश काढून फेकून देताना या जेलिफिशचे तंतू मच्छीमारांसह कामगारांच्या हातांना स्पर्श झाल्याने अंगाला खाज सुटते. त्या भागापासून दूर मासेमारी खलाशी कामगारांना कुठलीही इजा होऊ नये , यासाठी मच्छीमार बांधव समुद्रात जेलिफिश दिसल्यास त्या भागात मासेमारी करत नाहीत. त्यामुळे मासेमारीसाठी त्या परिसरात जाऊन काही उपयोग होत नाही. तेथे जाण्याचा खर्च फुकट जातो. त्यामुळे सापडणा-या या जेलफिशमुळे मच्छिमारांसमोर संकट उभे राहिले आहे.
.........................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256 / 9529501121

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा