*काजू बीसह सुपारी तारण योजनेसाठी आवाहन*

*काजू बीसह सुपारी तारण योजनेसाठी आवाहन*



रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाची काजू-बी व सुपारी शेतमाल तारण योजना रत्नागिरी जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समिती, रत्नागिरीकडून राबवण्यात येत आहे. पणन मंडळाने दिलेल्या परिपत्रकीय अटी व सूचनांप्रमाणे काजू-बी बाजारभावाच्या ७५ टक्के शेतमाल तारण कर्ज म्हणून देण्यात येईल. रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनी काजू-बी शेतमाल तारण कर्ज योजनच्या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी उत्पन्न बाजार समितीने केले आहे. याबाबत अधिक माहितीसाठी पाडूंरग कदम (निरीक्षक), रोहित सुर्वे (क.लिपिक) यांच्याशी संपर्क साधावा, असे सचिव रत्नागिरी जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समिती, रत्नागिरी यांनी कळविले आहे.

........................................

२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256  / 9529501121




 

Comments