दुचाकीच्या धडकेत सायकलस्वार वृद्धाचा मृत्यू

दुचाकीच्या धडकेत सायकलस्वार वृद्धाचा मृत्यू


चिपळूण : शहारातील मार्कंडी येथील मुख्य रस्त्यावर नितीन अरमारे (चिपळूण) यांच्या दुचाकीची धडक बसून डोक्याला गंभीर दुखापत होऊन सायकलस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सायंकाळी घडली. धनंजय नाटुस्कर (६२, मार्कंडी) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबतची फिर्याद त्यांचा मुलगा धीरज नाटुस्कर यांनी चिपळूण पोलिस ठाण्यात दिली.

Comments