शिरोळ (अनिल लोंढे) मौजे चिंचवाड येथील समाज मंदिर बांधकाम प्रश्नासाठी बहुजन समाज पार्टी च्या वतीने पंचायत समिती शिरोळ येथे नवीन समाज मंदिर बांधकाम परमिशन मिळण्यासाठी बेमुदत अमरण उपोषण करण्यात आले.
उपअभियंता बांधकाम अधिकारी पंचायत समिती शिरोळ यांनी मौजे चिंचवड येथील सरपंच व ग्राम विकास अधिकारी यांना उपमुख्य अधिकारी जिल्हा परिषद कोल्हापूर यांच्या दालनामध्ये मौजे चिंचवड येथील नवीन समाज मंदिराची सुनावणी होती. परंतु काही कारणास्तव सुनावणी झाली नसताना देखील शिरोळ पंचायत समिती यांनी जिल्हा परिषद कोल्हापूर यांच्याकडून नवीन समाज मंदिराची सुनावणी होणार नाही असं खोट बोलून पंचायत समिती बांधकाम विभागाकडून स्थगितीचे आदेश शिरोळ पंचायत समिती कडुन देण्यात आले .
उपमुख्यकार्यकारी अधिकारी यांच्याकडून कोणतीही लेखी स्वरूपाचे पत्र पंचायत समिती शिरोळ यांच्याकडे आले नाही असे उपोषणकर्त्यांचे म्हणणे असून पंचायत समिती शिरोळ यांनी स्थगितीचे पत्र का दिले व याला अभय देते कोण अशी चर्चा उपोषणा वेळी दिसुन आली.
बहुजन समाज पार्टी च्या पदाधिकाऱ्यांनी शिरोळ पंचायत समितीकडून चिंचवाड येथील नवीन समाज मंदिर बांधकामासाठी दिलेली स्थगिती रद्द करून पुन्हा समाज मंदिर बांधकामाची परमिशन मिळावी यासाठी बहुजन समाज पार्टीच्या वतीने शिरोळ पंचायत समिती समोर बेमुदत उपोषण सुरू होते त्यावेळी बहुजन समाज पार्टीचे अध्यक्ष महेश कांबळे यांच्या वतीने उपोषण सुरूच ठेवण्यात आले त्यावेळी उपस्थित कार्यकर्ते संजय कांबळे, अण्णासो दरबारे, प्रदीप सावंत, प्रमोद सावंत, नानासो कांबळे, किरण कांबळे, सुशांत शिंगे, चंद्रकांत कांबळे व इतर पदाधिकारी उपस्थिती होते.
...............................
2.5 लाख हून अधिक वाचक
600+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewskop24@gmail.com
Freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा
9529501121
Comments
Post a Comment