महेश भट्ट का होऊ देत नाहीत आलिया भट्टचे लग्न? जाणून घ्या त्यामागचं कारण......
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांच्या लग्नाच्या चर्चांना सुरूवात झाली आहे. तिचं लग्न इतक्या लवकर व्हावं अशी तिच्या वडिलांची महेश भटांची अजिबात इच्छा नाही. महेश भटांना त्यांची मुलगी खूपच प्रिय आहे. त्यामुळे ते त्यांच्या मुलीला नजरेसमोरच ठेऊ इच्छितात.
एका मुलाखतीत आलियाने सांगितले की, "माझ्या वडिलांना आमची खूप काळजी आहे. त्यांची इच्छा झाली तर ते कधीच त्यांचे लग्न होऊ देणार नाहीत". आलियाने सांगतले की, "लग्नाचा विषय काढला की तिचे वडील तिला बाथरूममध्ये बंद करून ठेवण्याची धमकी देतात. मी तिला बाथरूममध्ये बंद करून ठेवेन पण तिला नजरेसमोरच ठेवेल तिला दूर जाऊ देणार नाही असं ते म्हणतात.
आलिया पुढे म्हणाली की," आम्ही त्यांना कधीच सोडून दूर जाऊ नये अशी वडिलांची इच्छा आहे. ते माझं लग्न होऊ देत नाहीत कारण त्यांना भिती वाटते की, मी त्यांना सोडून दूर निघून जाईन."
नुकताच आलियाने साजरा केला वाढदिवस
नुकताच आलियाने तिचा 28 वा वाढदिवस साजरा केला आहे. तिच्या वाढदिवसाला बॉलिवूडच्या अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. आलियाच्या वाढदिवसाचं आयोजन निर्माता करण जौहरने केले होते. या कार्यक्रमात दीपिका पादुकोण, अयान मुखर्जी, अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा उपस्थित होते. पण आलियाचा प्रियकर आणि अभिनेता रणबीर कपूर कोरोनाबाधित असल्याने उपस्थित नव्हता.
लवकरच 'RRR' नावाच्या चित्रपटातून येणार प्रेक्षकांच्या भेटीला
आलिया लवकरच 'RRR'नावाच्या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटातील आलियाचा पहिला लूक प्रेक्षकांसमोर आलेला आहे. या चित्रपटात आलिया 'सिते'चे पात्र साकारणार आहे. चित्रपटातील आलियाच्या पहिल्याच लूक प्रेक्षकांना आवडला आहे. त्यामुळे चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट बघत आहेत.या चित्रपटाचे दिग्दर्शन बाहुबली फेम दिग्दर्शक एसएस राजामौली करत आहेत. सिताच्या पात्राचा तिचा लूक अत्यंत साधा असूनही दमदार आहे. या चित्रपटात आलियासोबत अजय देवगन आणि राम चरणदेखील दिसून येणार आहेत. पहिल्यांदाच तिघे एकत्र स्क्रीन शेअर करणार आहेत.
...............................
2.5 लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewskop24@gmail.com
Freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा
9529501121

Comments
Post a Comment