रत्नागिरी गुहागर तालुक्यातील तवसाळ गावच्या सुपुत्राचा "मायभूमी मराठी लघुपट ठरलाय "राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय" पुरस्कार फिल्म फेस्टिव्हल विजेता
मायभूमी मराठी लघुपट ठरलाय "राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय" पुरस्कार फिल्म फेस्टिव्हल विजेता
मुंबई:रत्नागिरी गुहागर तालुक्यातील तवसाळ गावच्या सुपुत्राचा "मायभूमी" मराठी लघुपट ठरलाय "राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय" पुरस्कार फिल्म फेस्टिव्हल विजेता.....! आशियन इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल मध्ये बेस्ट स्टोरी अवॉर्ड, तर राष्ट्रीय मध्ये बेस्ट सोशल फिल्म व बेस्ट डिरेक्टर अवॉर्ड...!
क्लिक करा आणि वाचा:रत्नागिरीतील ओसवाल नगर येथील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
कोकण म्हटले तर निसर्ग सौंदर्याने नटलेली खाणच ती ... कोकणच्या या स्वर्गनगरीत अनेक कलाकार, वादक , संगीतकार, लेखक, दिग्दर्शक, नाटककार, जाखडीनृत्यकार, लोकशाहीर,पार्श्वगायक ,पार्श्वगायिका, नृत्यांगना, नायक, नायिका, अशी अनेक अनमोल रत्न आज कोकणच्या रत्नखाणीत जन्माला आलेली आहेत. कोकणच्या रम्य निसर्गाच्या सानिध्यात वसलेले तवसाळ बाबरवाडी ह्याच खेडेगावात सामान्य कुटुंबात जन्माला आलेला एक युवक लेखक दिग्दर्शक राजेश गंगाराम येद्रे यांच्या लेखणीतून उतरलेला पहिलाच मराठी लघुपट मायभूमी या लघुपटाला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलमध्ये पुरस्कार (अवॉर्ड) प्राप्त झाले आहेत. या मराठी लघुपट चित्रपटाला राष्ट्रीयआंतराष्ट्रीय पुरस्कार सोबतच निवड व नामांकन सुद्धा मिळालेली आहेत.
क्लिक करा आणि वाचा:रत्नागिरी-गुरुमळीत आंबा बागेत गळफास घेत गुरख्याची आत्महत्या
नमन लेखक ते आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्रवास, थोडासा प्रवास कठीणच होता. कोकणातील प्रसिद्ध लोककला नमन ...! या नमनामध्ये वगनाट्य कलाकृतीची लेखणी करता करता मराठी लघुपट बनवणे हे त्यांचे स्वप्न होते. मराठी लघुपट बनवण्याचे त्याचे स्वप्न मायभूमी लघुपटाने आज प्रत्येक्षात साकार झाले आहे.
क्लिक करा आणि वाचा:“राहुल गांधी माफी मागता मागता थकून जातील पण …”; चंद्रकांत पाटलांची टीका
मायभूमी लघुपटाचा प्रवास खुपच खडतरच होताच. आणि तेवढाच नाविन्यपूर्ण देखील होता. हा लघुपट बनवताना अनेक अडचणीचा सामना करत अखेर लघुपट चित्रित झाला.या लघुपटात कोकणातील अनेक नवोदित कलाकार आहेत. स्वराज्य कोकण कलामंच प्रोड्यकॅशन प्रस्तुत निर्मित मायभूमी हा लघुपट आपणा सर्वांच्या लवकरच भेटीला येतोय.या लघुपटाचे लेखन आणि दिग्दर्शन राजेश गंगाराम येद्रे यांनी केले असून. कु. योगेश जोशी यांनी आपल्या अनुभवातून उत्तम साथ देवून दिग्दर्शनला चांगला हातभार लावला तर संदेश येद्रे यांनी सुद्धा आपल्या भूमिकेबरोबर दिग्दर्शनाला चांगली साथ दिली.तर ह्या लघुपटाचे चित्रीकरण आणि एडिटिंग उत्कृष्ट छायाचित्रकार कु.अमोल कावणकर आणि योगेश जोशी यांनी केले असून, लघुपटाचे निर्माते डॉ. संजय जाधव व दिपक मांडवकर (पत्रकार) आहेत. तर उत्तम संगीत संयोजक परेश पवार आणि अमोल नानिस्कर (स्मित म्युझिक स्टुडिओ) यांनी संगीत दिले आहे.तर महेश नेवरेकर (MN Art & Media) यांनी लघुपटाचे सुरेख पोस्टर डिजाईन केलं असून, लघुपटाला संगीत कसं हवं ते केल्याने काय होते यावर लाख मोलाचे मार्गदर्शन केले. तर लघुपटात सुगंधा राऊत, संदेश येद्रे , मानसी वर्तक आणि आदेश घडवले यांच्या मुख्य भूमिका असून सहकलाकार म्हणून डॉ विद्या सावंत, दिपक मांडवकर, प्रकाश बारस्कर, नरेश येद्रे, विकास येद्रे,अरुण जाधव, छाया पालवे, सोनाली, पूजा माने, राजेश झेपले, आर्या नरसाळे, निकिता मोरे, प्रतीक्षा जाधव, सुनील धोपट, अमोल कावनकार, प्रकाश मिसाळ,अरुण जाधव, संगम येद्रे,सार्थक जाधव, वेदांत मांडवकर आहेत. तर अध्यान पाटील हा बाळकलाकार असून या लघुपटाला बेस्ट स्टोरी हा आंतराष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. तर राष्ट्रीय मध्ये बेस्ट सोशल फिल्म बेस्ट डिरेक्टरहे पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. तर अनेक फेस्टिव्हल मध्ये अधिकृत निवड व नामांकन सुद्धा मिळाला हा लघुपट आहे.
क्लिक करा आणि वाचा:मुख्यमंत्र्यांचा विधानसभेत एकेरी उल्लेख;फडणवीसांनी केली दिलगिरी व्यक्त!
मायभूमी लघुपटातील बरीचशी मंडळी नमन करणारी कोकणातील आहेत.आज या कलाकारांनी मायभूमी लघुपटाद्वारे आपली कला सादर करून सातासमुद्रापार पोहचवून एक वेगळाच ठसा उमटवला आहे. आपल्या मायभूमीची महती आणि जगाच्या पोशिंदाने मायभूमीला घातलेल्या आर्त हाकेची कहाणी असून हा लघुपट खेळीमेळीच्या वातावरणात चित्रित झाला असून अनेक दृश्य हि कोकणातील गुहागर मधील आहेत. हा लघुपटाचे दिग्दर्शन राजेश येद्रे ह्यांनी केलं असून असा कोणताही मोठा अनुभव त्याच्या पाठीशी नसताना एक प्रबळ इच्छाशक्ती होती लघुपट बनवायचाच आणि लघुपट तयार झाला सुद्धा. त्यांना नेहमीच सावळीसारखे उभे राहणारे उत्कृष्ट कलाकार दिग्दर्शक संदेश येद्रे यांची चांगलीच साथ लाभली. नमन दिग्दर्शन ते लघुपट दिग्दर्शन प्रवास थोडा वेगळाच. या लघुपटाला अनेक नामवंत लोकांचे मोलाचे सहकार्य व हातभार लागला आहे त्यामध्ये डॉ.विद्या सावंत, अरुण मोरे, प्रदीप लाड, विजय सावंत, शकुंतला हरवटे, अलका वर्तक, प्रतीक्षा जाधव, सुनील धोपट, संदेश भडवळकर, संतोष येद्रे, शिरीष कदम,सुरेश बारस्कर,मयुरी बनसोडे, अशोक बनसोडे, सौरभ चव्हाण,जयेश डिंगणकर, प्रकाश बारस्कर, नरेश येद्रे, दिलीप वेलुंडे, राजेश जोशी साक्षी येद्रे,रुपेश बारस्कर,श्रुती येद्रे, सिद्धेश मोरे सुरज पारदुले यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे. या लघुपटाने अनेक ठिकाणी ऑफिसल सेलिकशन सोबत ७ कलर्स इंटरनॅशनल फिल्म फिस्टिव्हल मध्ये सुद्धा अनेक देशातून फिल्म दाखल झाल्या होत्या. यामध्ये सुध्दा अनेक देशाच्या यादीत मायभूमी लघुपटाची निवड होऊन सध्या फिल्म निकालच्या प्रतिक्षेकडे आहे.हा लघुपट ५ मार्च २०२१ रोजी स्वराज्य कोकण कलामंच प्रोड्यकॅशन ...SKK Production ह्या युट्यूब वाहिनीवरती सर्वांना पाहायला मिळेल.सर्वांनीच हा लघुपट पाहावा. कृपया सर्वांनी लिंकला ओपन करुन चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करून बेल आयकाॅन दाबायला विसरू नका. आणि हो व्हिडिओ आवडल्यास नक्कीच कमेंट्स करून शेअर्स करायला विसरून नका. असे आवाहन लघुपटाचे लेखक दिग्दर्शक राजेश येद्रे ,संदेश येद्रे ,लघुपट निर्माते पत्रकार दिपक मांडवकर यांनी केले आहे.
-शांत्ताराम गुडेकर
प्रतिनिधि
..........................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.........................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.........................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक RNI- MAHMAR/2011/39536
...........................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256 / 9529501121
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.........................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.........................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक RNI- MAHMAR/2011/39536
...........................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256 / 9529501121

Comments
Post a Comment