रत्नागिरीतील मास्कवरिल कारवाई सर्वसामान्यांवरच, प्रशासकिय अधिकारी, पोलीस अधिकारी, कर्मचारी यांना सुट का?
रत्नागिरीतील मास्कवरिल कारवाई सर्वसामान्यांवरच, प्रशासकिय अधिकारी, पोलीस अधिकारी, कर्मचारी यांना सुट का?
बहुजन विकास आघाडीचे रत्नागिरी जिल्हा पोलिस अधिक्षकांना पत्र
रत्नागिरी प्रतिनिधी:-कोव्हीड -१९ च्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्हाधिकारी यांनी तमाम जनतेला मास्क वापरण्याचे आवाहन केले आहे. त्यातच जिल्हा पोलिस अधिक्षक रत्नागिरी यांचे आदेशाने पोलिस प्रशासन सर्व सामान्य जनतेवर मास्क नसेल तर झडपच घालत आहेत व ५०० रुपयांची पावती फाडत आहे. आणि ते केल्याने आपण एखादे शौर्य केल्यासारखे वावरत आहेत. हा अन्याय सर्व सामान्यांवरच का? प्रशासकिय अधिकारी, पोलीस अधिकारी, कर्मचारी यांना सुट का? ते सरकारचे जावई म्हणून? असा संतप्त सवाल बहुजन विकास आघाडीने केला आहे. ग्रामीण पोलिस ठाणे रत्नागिरी कारवांचीवाडी फाटा येथे एका चहा-वडापावच्या टपरीवर काम करणाऱ्या आचारी हो मुळात प्रचंड गरमी, उकळते तेल यात वावरत असतो. अशावेळी मास्क कितीवेळ लावणार? पण त्या पोलीस कर्मचारीला हे कळले नाही. तरीही नाकाच्या खाली मास्क असूनसुद्धा तात्काळ पावती केली. तसेच कारवांचीवाडी फाटयाजवळच एका इसमाचे सख्खे चुलते मयत झाल्याचा फोन आला. तो फोनवर बोलत असताना त्यांचे काहीही न ऐकता पोलिसानी ५०० रुपयांची पावती फाडली गेली. शासकीय कर्मचारी, ऑफिसमध्ये पंख्याखाली बसून काम करत असताना सुद्धा तासनतास मास्क लावू शकत नाही. मग उन्हातान्हात काम करणाऱ्या शेतमजूरांचे व कामागारांचे काय? याचे उत्तर पोलिस देतील काय? अशा कारवाई मुळे पोलीस प्रशासन जनतेचे रक्षक आहेत कि आर्थिक भक्षक आहेत? हा आम जनतेला प्रश्न पडला आहे. आज पोलिसांची सातत्याने सामान्यावरच दांडगाई का? मग ती हेल्मेट असूदे कि मास्कची पावती असूदे या व्यतिरिक्त दुसरे कामच नाही असा संतप्त सवालही बहुजन विकास आघाडीने केला आहे. अशी परिस्थिती रत्नागिरी जिल्हयामध्ये सुरु आहे.
ही सुडाची कारवाई थांबली नाही तर बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते प्रत्येक पोलीस ठाणे, तहसिल कार्यालय, जिल्हा कार्यालय आदी ठिकाणी जावून मास्क नसलेल्या व्यक्तींचा फोटो काढून दररोज पोलीस अधिकारी यांना देणार व दंड ठोठावण्यास भाग पाडणार आहेत. तसेच दि . १-०३-२०२१ ते ५-३-२०२१ चे पोलीस स्टेशन , तससिल कार्यालय व जिल्हाधिकारी कार्यालय यांचे सी.सी.टिव्ही फुटेज मिळावे ही या निवेदनाने मागणी आहे. पोलिस प्रशासनाने जिल्हाधिकारी रत्नागिरी यांना दंड ठोठवावा. दि.२० जानेवारी २०२१ रोजी चिपळूणच्या इंदिरा गांधी सांस्कृतीक केंद्राची पाहणी केली तेव्हा स्वतः जिल्हाधिकारी मिश्रा यांनी ना मास्क लावला ना अधिकारी यांनी. तसेच ना सोशल डिस्टंसिंगचे पालन केले. याबाबत छायाचित्र जोडत आहे. तसेच अनेक कार्यक्रमात स्वतः जिल्हाधिकारी मास्क लावत नाही मग सर्व सामान्यांनीच का लावावा? सामान्य माणूस रस्त्यावर चालला तर कोरोनाचा प्रसार होतो पण शासकीय कार्यालयात तासनतास मास्क न लावल्यामुळे कोरोना पसरत नाही का असा संतप्त सवालही केला आहे. पोलिस प्रशासनाला मिळालेल्या अधिकाराचा वापर अशा अधिकाऱ्यांवर पण करा तरच सर्वसमावेशक न्याय म्हणता येईल.
येत्या पाच दिवसात किती प्रशासकीय व शासकीय अधिकारी कर्मचारी यांवर दंडात्मक कारवाई केली ते सार्वत्रिक व्हावे. उगाच सामान्यांना त्रास देवू नये. मार्च २०२० ते मार्च २०२१ पर्यंत १ वर्ष व्हायला आले. बेरोजगारांना रोजगार नाही. जे पावत्या फाडत आहेत त्यांना गलेलठ्ठ पगार आहेत. आदेश काढणा-यांनी वस्तुस्थितीची जाणिव ठेवावी अन्यथा मानसिक खच्चीकरण होवून आम जनतेस आत्महत्येस भाग पाडाल हे लक्षात ठेवावे. हे जिझिया कर लावण्याअगोदर रोजगार देण्यावर भर द्या. सर्व सामान्यांचे दरडोई उत्पन्न काय याचा विचार व्हावा. रत्नागिरी जिल्हयातील पोलिस अधिकाऱ्यांनी किंवा कर्मचाऱ्यानी कोरोना काळात किती सर्वसामान्यांचे संसार उभे केले हे जाहिर करावे. जे विनाकारण फिरत आहेत त्यावर जरुर कारवाई करा पण पोलीस अधिक्षकांनी दिलेल्या उद्दीष्टांसाठी सर्वसामान्यांवर दरोडा नको, अन्यथा जनसामान्यांचा न्याय हक्कांसाठी आंदोलन उभारावे लागेल. अशा आशयाचे पत्र बहुजन विकास आघाडीने रत्नागिरी जिल्हा पोलिस अधिक्षकांना सादर केले आहे. या निवेदनावर जिल्हाप्रमुख तानाजी कुळये, उपाध्यक्ष टी.एस.दुड्ये, संपर्कप्रमुख रामचंद्र कोत्रे, शैलेश खरडे, प्रणय करंडे आदींच्या सह्या आहेत.
.........................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256 / 9529501121
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256 / 9529501121

Comments
Post a Comment