"स्वामी...! सहर कब होगी ?" या हिंदी चित्रपटाचे चित्रीकरण कोल्हापूरातील पडवळवाडी येथे मोठ्या उत्साहात सुरू...

('स्वामी ..! सहर कब होगी ?  या चित्रपटाचे निर्माता, कलाकार, तंत्रज्ञ )
कोल्हापूर : (प्रतिनिधी) लेखक, दिग्दर्शक, निर्माता श्री मुन्नावर शमीम भगत यांच्या 'मीना शमीन'  या निर्मिती संस्थेच्यावतीने हिंदी चित्रपट 'स्वामी ..! सहर कब होगी ? या चित्रपटाचे चित्रीकरण शासनाने नेमून दिलेल्या अटीचे पालन करत जोतिबाच्या पायथ्याशी असलेल्या पडवळवाडी या गावामध्ये सुरू झाले असून अगदी नियोजनबद्ध सुरू आहे. ठरलेल्या वेळेतच चित्रीकरण पूर्ण  करण्याचा दिग्दर्शक यांचा मानस आहे.

 दुष्काळावर आधारीत या सिनेमाची कथा असून या चित्रपटाचे छायाचित्रण श्री. अरविंदसिंह पुवंर, कला दिग्दर्शक- नरहरी आलासे, साऊंड रेकॉर्डिस्ट- प्रकाश निकम,  रंगभूषा - सदाशिव सूर्यवंशी,  हेअर ड्रेसर-  अश्विनी सितारे, ड्रेसमन - कुर्बान अली,  प्रमुख कलाकार विजय भाटिया, रेवती अय्यर, तर कोल्हापुरातील प्रसाद माळी, संजय टिपुगडे, एन.डी. चौगुले,  शितल भोसले, शालवी शहा यांच्या महत्त्वाच्या भूमिका असून या चित्रपटाची निर्मिती व्यवस्थापन अमर मठपती सांभाळत आहेत. या निर्मिती संस्थेने गेल्या दोन वर्षात  या हिंदी  चित्रपटसोबत मराठी चित्रपटाची निर्मिती ही कोल्हापुरातच केली आहे. त्यामुळे कोल्हापूरमधील कलाकार, तंत्रज्ञ यांना त्यामुळे चांगली संधी उपलब्ध झाली आहे.  इथून पुढेही कोल्हापुरातील सुंदर निर्मितीस्थळे, लोकांचे चांगले सहकार्य, चित्रीकरणासाठी साजेसं वातावरण तसेच चित्रपटाची ऐतिहासिक परंपरा असलेल्या कोल्हापूर मध्ये 'मीना शमीन' या संस्थेच्या वतीने नवनवीन निर्मितीसाठी पुन्हा येथेच येऊ असे निर्माता, दिग्दर्शक मुन्नावर भगत यांनी यावेळी सांगितले. यावेळी शिवसेना जिल्हा महिला आघाडी प्रमुख सुनिता सावंत तसेच इतर कलाकार, तंत्रज्ञ उपस्थित होते.



2.5 लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते
24x7 
www.freshnewz.in
freshnewskop24@gmail.com

Freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी    पत्रकार होण्यासाठी  कॉल करा 

9529501121


Comments