शिवणे खुर्द, देवाचे गोठणे राऊतवाडी सजाच्या तलाठी, मंडळ अधिका-यांशी संपर्क कसा साधायचा? मोबाईल?, ई मेल?, व्हॉट्स अप?, की पोस्टाने?





 शिवणे खुर्द, देवाचे गोठणे राऊतवाडी सजाच्या तलाठी, मंडळ अधिका-यांशी संपर्क कसा साधायचा? मोबाईल?, ई मेल?, व्हॉट्स अप?, की पोस्टाने?



रत्नागिरी:-राजापूर तालुक्यातील शिवणे खुर्द, देवाचे गोठणे राऊत वाडीच्या तलाठी आणि मंडळ अधिका-यांशी संपर्क कसा साधायचा? मोबाईल, ई मेल, व्हॉट्स अप की पोस्टाने  हा प्रश्न या परिसरातील ग्रामस्थांना सध्या उपस्थीत होतोय. तलाठी, मंडळ अधिकारी यांचा मोबाईल नंबर लागत नाही. मोबाईल काही वेळेला बिझी लागतात तर काही वेळेला आऊट ऑफ नेटवर्क लागतात. रिंग वाजली तरी फोन उचललेच जात नाहित. खुप बिझी असतात का असा प्रश्न ग्रामस्थांना पडतोय. तलाठी सजामध्ये तलाठी, मंडळ अधिकारी दररोज भेटणार का?, पुर्ण वेळ सजामध्ये कधी बसणार?, कोणकोणत्या वाराला सजामध्ये पूर्ण वेळ बसणार?, ग्रामपंचायतींशी सुसंवाद असतो का?, ग्रामस्थांना 7/12, 8/अ उतारे, फेरफार उतारे हवे असतील तर मग तलाठ्यांच्या कंप्युटरला नेटवर्क मिळायला पाहिजे. ते नसेल तर काय?, अशा अनेक समस्यांशी ग्रामस्थांना सामोरे जावे लागतेय. माननीय तहसिलदार यावर काही उपाययोजना करतील का? अशी आशा येथील ग्रामस्थांना लागून राहिली आहे.



........................................

२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256  / 952950112



Comments