कर्नाटक शासनाच्या विरोधात घोषणा देत शिवसैनिकांनी शिवाजी चौक दणाणून सोडला


                                                                (छाया - तय्यब अली)

कोल्हापूर :-  कोल्हापूर शिवाजी चौकात शिवसेना कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्या वतीने कर्नाटक शासनाच्या विरोधात घोषणा देत, छत्रपती शिवाजी चौक दणाणून सोडला. निमित्त होते ते कर्नाटक शासनाच्या दडपशाहीचा विरोधी कन्नड उद्योजकांनी उद्योग बंद आंदोलनाचे...! सर्व कन्नड वासीयांनी आपले उद्योग शिवसेनेच्या आव्हानानंतर बंद ठेवले होते. बेळगाव येथे उभा करण्यात आलेला लाल-पिवळा ध्वज जोपर्यंत काढून टाकला जात नाही, तोपर्यंत असे तीव्र आंदोलन सुरू राहील. असे शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार व विजय देवणे यांनी घोषित केले.  

यावेळी सुजित भाऊ चव्हाण, शिवाजी जाधव, माजी आमदार सुरेश साळुंखे, राजू जाधव, राजू यादव, मंजीत माने, अवधूत साळुंखे, हर्षल सुर्वे, विनोद खोत, विराज पाटील, मेघना पेडणेकर, राजेंद्र पाटील, अरुण अब्दागिरी, सरदार पोवार, पूजा शिंदे, गीतांजली गायकवाड, स्मिता सावंत, शुभांगी पोवार,  आदी कार्यकर्ते उपस्थित होते 



...............................
2.5 लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते
24x7 
www.freshnewz.in
freshnewskop24@gmail.com

Freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी    पत्रकार होण्यासाठी  कॉल करा 

9529501121


Comments