असे नको म्हातारपण-दैनिक फ्रेश न्यूज:साहित्य सहवास




  असे नको म्हातारपण



आयुष्य गेले सारे सरून
संसार सारा सांभाळून
थकव्याने त्रासले आजारपण
म्हणून नकोसे झाले  आई बाबांचे म्हातारपण..।।१!!


कमावलेली आयुष्यभर कमाई
मनाला विसावा ना हो  देई
मरणांची यांना झालीच घाई
अशी हि हल्लीची तरुणाई...।।२!!


नाही विश्वास कुणी कोणाचा
जरिही असला  किती नात्यागोत्याचा
मेल्यावर  दाखवितो    नातं आपुलकीचा
असा हा खेळ चारदिवसाचा..।।3!!


कोपऱ्यात त्यांना दिला जातो वावं
अपशब्दांचे पाडती घाव
जेवणाच ताट चहाचा कप  लांबुन द्याव
किती कष्ट करुन लागत सोसाव।।४!!


 लहान लहान नातवंड हाक देती
आजी आजोबा  खेळा संगाती
स्पर्शीले तर  घरातलेच ओरडती
फिरण्यावर हि बंदी त्यांच्याभोवती..।।५!!



  श्री. सुरज यशवंत बारस्कर काताळे (मावळतवाडी)
ता.गुहागर / जि.रत्नागिरी
८६०५९४०६१९
फ्रेश न्यूज वार्षिक कविता प्रिंटेड विशेषांक पोस्टल खरचा सहित : 600/-
 फ्रेश न्यूज साहित्य सहवास 





 

२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256


टिप्पण्या

news.mangocity.org