'सीमेवर ज्यांची मुलं जीव ओवाळून टाकतात, त्यांच्यासाठी दिल्लीत खिळे पांघरलेत'-राहुल गांधींची केंद्र सरकारवर टीका

 'सीमेवर ज्यांची मुलं जीव ओवाळून टाकतात, त्यांच्यासाठी दिल्लीत खिळे पांघरलेत'-राहुल गांधींची केंद्र सरकारवर टीका

- राहुल गांधींची केंद्र सरकारवर टीका
- शेतकरी आंदोलनाला १०० दिवस पूर्ण
- शेतकऱ्यांनी आजचा दिवस 'काळ दिवस' पाळला

नवी दिल्ली : काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांनी शेतकरी आंदोलनाला १०० दिवस पूर्ण झाल्याच्या निमित्ताने पुन्हा एकदा केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. 'सीमेवर ज्यांची मुलं जीव ओवाळून टाकतात, त्यांच्यासाठी दिल्लीत खिळे पांघरलेत' असं राहुल गांधी सोशल मीडियावर म्हटलंय. शेतकरी आपला अधिकार मागत आहेत परंतु, केंद्रातील सरकार अधिकाराऐवजी त्यांच्यावर अत्याचार करत आहेत, अशी टीकाही राहुल गांधींनी केलीय.
याआधीही राहुल गांधी यांनी केंद्रावर निशाणा साधताना केंद्र सरकारला तीनही कृषी कायदे मागे घ्यावे लागतील, असं म्हटलं होतं. 'बियाणं पेरून जे धैर्यानं पिकाची वाट पाहतात, महिन्यांच्या प्रतिक्षेला आणि खराब हवामानाला ते घाबरत नाहीत' असं म्हणत त्यांनी आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना आपला पाठिंबाही दिला होता.


केंद्र सरकारकडून लागू करण्यात आलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात राजधानी दिल्लीच्या सीमेवर सुरू झालेल्या आंदोलनाला आता १०० दिवस पूर्ण झाले आहेत. गेल्या वषी २६ नोव्हेंबरपासून 'चलो दिल्ली' म्हणत शेतकऱ्यांनी राजधानीच्या सीमेवर ठाण मांडलं होतं.


मिळालेल्या माहितीनुसार, या आंदोलनादरम्यान आतापर्यंत वेगवेगळ्या कारणांनी २४८ जणांनी प्राण गमावले आहेत. त्यामुळे आजचा आंदोलनाचा १०० दिवस शेतकरी 'काळा दिवस' पाळत आहेत.


........................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256  / 9529501121


Comments