माहेर-दैनिक फ्रेश न्यूज:साहित्य सहवास


माहेर


पोटी जन्माला येऊनी
ऊंबरठा ओलांडीते
परक्याची तु होताना
अश्रुंनी डोळे भरीते...(१)


आई बापाच लेकरू
लाडाने दिलेली माया
कडे खांद्यावर घेऊन
निजविले कुशीत या...(२)


दोन नात्यात गुंतला
खेळ माहेर सासर
लक्ष्मीच तुझ पाऊल
देई मायेचा सागर...(3)


भोगतेस दुःख सारी
संसार तु  थाटताना
विसर पडुन जातो
बालपणी आठवणींना..(४)


माहेर तुझ मंदिर
उजळलेली तु ज्योत
सौभाग्यवती तु नार
आयुष्यभर ती साथ..(५)


 श्री .सुरज .यशवंत बारस्कर
 मु-काताळे  (मावळतवाडी)ता.गुहागर
जिल्हा-रत्नागिरी
८६०५९४०६१९
फ्रेश न्यूज वार्षिक कविता प्रिंटेड विशेषांक पोस्टल खरचा सहित : 600/-
 फ्रेश न्यूज साहित्य सहवास 







२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256


Comments