कोरोना लसीकरणासाठी जिल्ह्यातील सहा खासगी रुग्णालयांची निवड


कोरोना लसीकरणासाठी जिल्ह्यातील सहा खासगी रुग्णालयांची निवड


रत्नागिरी : केंद्र सरकारने १६ जानेवारीला कोरोना लसीकरणाचा पहिला टप्पा सुरू केला. दि. १ मार्चपासून कोरोना लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरू होणार आहे. जिल्ह्यातील सहा खासगी रुग्णालयांची लसीकरणासाठी निवड करण्यात आली आहे. मात्र, या रुग्णालयांना शासनाकडून कोणतीही माहिती देण्यात आली नसल्याने नेमके लसीकरण कधी सुरू होणार याबाबत साशंकता आहे. केंद्र आरोग्य योजनेत ११६ खासगी रुग्णालयात कोरोना लसीकरण होणार आहे. यात रत्नागिरीतील ६ रुग्णालयांचा समावेश आहे. एसएमएस रुग्णालय, चिपळूण तालुक्यातील लाईफ केअर आणि श्री विठ्ठलराव जोशी चॅरिटेबल ट्रस्ट हॉस्पिटल, डेरवण, रत्नागिरी तालुक्यातील श्री रामनाथ आणिपरकार हॉस्पिटल तर लांजा तालुक्यातील पंडित दीनदयाळ उपाध्याय हॉस्पिटल येथे लसीकरण करण्यात येणार आहे. पंतप्रधान आयुष्मान भारत जनआरोग्य योजना, महात्मा फुले आरोग्य योजना अशा शासकीय योजनांचे लाभ देणाऱ्या रुग्णालयांमध्येच ही लस उपलब्ध होणार आहे.


..........................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.........................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.........................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
...........................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256  / 9529501121

टिप्पण्या