*दुर्लक्षित 'जनमित्रांचा' सन्मान करून जेसीआय ने सामाजिक बांधिलकी जपली*

 *दुर्लक्षित 'जनमित्रांचा' सन्मान करून जेसीआय ने सामाजिक बांधिलकी जपली : विशाल शिवतरे*

 सॅल्यूट द सायलेंट वर्कर उपक्रमात वायरमन यांचा केला सन्मान



खेड :  प्रतिनिधी (मंदार आपटे)

 चक्रीवादळ, फयानवादळ, कोरोना महामारी या परिस्तिथीमध्ये ही आपले काम चोखपणे बजावणारे महावितरण चे वीज कर्मचारी 'जनमित्र' हा घटक दुर्लक्षित होता. मात्र जेसीआय खेड ने त्यांचा सन्मान करून सामाजिक बांधिलकी जपली आहे. असे उदगार महावितरणचे खेड येथील कार्यकारी अभियंता श्री. विशाल शिवतरे यांनी काढले.

         खेड जेसीआयच्या वतीने खेड महावितरण कार्यालयातील वायरमन जनमित्र यांचा आज सॅल्यूट द सायलेंट वर्कर या उपक्रमाअंतर्गत सन्मान करण्यात आला यावेळी ते बोलत होते. 

      ते पुढे म्हणाले की खेड जेसीआय नेहमीच समाजोपयोगी राबवत असते त्याचप्रमाणे ऊन पाऊस, वारा, याची तमा न बाळगता अविरतपणे कार्य करणारे जनमित्र हे दुर्लक्षित होते. मात्र जेसीआय ने त्यांचा सन्मान करून सामाजिक बांधिलकी जपल्या बद्धल आभार मानून खेड जेसीआय ला वेळोवेळी सहकार्य करणार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. 

        यावेळी महावितरणचे उपकार्यकारी अभियंता श्री. अनिरुद्ध घाटगे, सहायक अभियंता श्री. कुलकर्णी, खेड जेसीआय चे अध्यक्ष जेसी. पराग पाटणे, सचिव जेसी. उमेश खेडेकर, कार्यक्रम प्रमुख जेसी संकेत आपिष्टे, जेसी. विनय शिरगावकर, जेसी. अभि पाटणे, जेसी. रोहन भोजने, जेसी. सचिन वानखेडे, जेसी. आशिष रेपाल, जेसी. प्रथमेश खामकर, जेसी. अमर दळवी, जेसी. हेमंत चिखले, आदी सभासद आणि महावितरण चे कर्मचारी उपस्थित होते.

........................................

२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256  / 9529501121


Comments