*नवनिर्माण शिक्षण संस्थेच्या रत्नागिरी येथील एस.पी. हेगशेट्ये महाविद्यालयात आयोजीत क्विझइट टेकफेस्ट राज्यस्थरीय ऑनलाईन स्पर्धेला भरघोस प्रतिसाद*
*नवनिर्माण शिक्षण संस्थेच्या रत्नागिरी येथील एस.पी. हेगशेट्ये महाविद्यालयात आयोजीत क्विझइट टेकफेस्ट राज्यस्थरीय ऑनलाईन स्पर्धेला भरघोस प्रतिसाद*
रत्नागिरी प्रतिनिधी:-
नवनिर्माण शिक्षण संस्थेच्या रत्नागिरी येथील एस पी हेगशेट्ये महाविद्यालयात गेल्या दहा वर्षापासून सुरू असलेली " क्विझइट टेकफेस्ट " राज्यस्तरीय स्पर्धा या वर्षी आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने ऑनलाईन पध्दतीने घेण्यात आली. पुणे, मुंबई, नासिक, कोल्हापूर मिरज संपूर्ण महाराष्ट्रातून 117 विद्यार्थी सहभागी झाले.
कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थेचे चेअरमन अभिजित हेगशेट्ये यांच्या हस्ते करण्यात आले.
ऑनलाईन स्पर्धेच्या बक्षीस वितरण प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून आयटी डिपार्टमेंट महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रीसिटी डिस्ट्रीब्युशन कंपणी लि. कोकन रिजनचे डेप्युटी जनरल मॅनेजर श्री. योगेश खैरणार लाभले या प्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सध्याच्या काळात आधुनिक तंत्रज्ञानाचे महत्व व ट्रेंडींग टेक्नॉलॉजी बद्दल मोलाचे मार्गदर्शन केले.
ऑनलाईन स्पर्धा कनिष्ट आणि वरिष्ठ दोन भागात घेण्यात आली. कनिष्ठ विभागात
क्विझ मध्ये प्रथम सिद्रा मोडक व सलोनी पेडांबकर भाई हेगशेट्ये कॉलेज संगमेश्वर., द्वितीय मलिका कदम व मदिहा शेख अ ई कालशेकर संगमेश्वर.
स्पीच पॉईंट मध्ये प्रथम नुपूर पवार अभ्यंकर कुलकर्णी कॉलेज, द्वितीय सलोनी कांबळे संगमेश्वर.
वरिष्ठ विभागातील क्विझइट टेकफेस्ट राज्यस्थरीय ऑनलाईन स्पर्धेतील
क्विझ इट स्पर्धेत प्रथम अमल नायर आणि निलम वाघमारे व द्वितीय आर्वा कल्याणवाला डोंबिवली मॉडेल कॉलेज मुंबई.
स्मार्ट कोडर मध्ये प्रथम अमल नायर आणि निलम वाघमारे व द्वितीय आर्वा कल्याणवाला.
प्रोजेक्ट पॉईंट मध्ये प्रथम ऋतुजा बिडवकर आणि रसिका शिर्के डीबीजे चिपळूण, द्वितीय लिणा साळुंखे आणि सौरभ आणावकर वेंगुर्लेकर कॉलेज पणदूर तिठा.
गेम वार मध्ये प्रसाद सावंत, द्वितीय कुणाल पावसकर एसपी हेगशेट्ये कॉलेज रत्नागिरी
याप्रसंगी उपस्थित संस्थेचे चेअरमन अभिजित हेगशेट्ये, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वामन सांवत यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व शुभेच्छा दिल्या.
हा कार्यक्रम विभाग प्रमुख प्रा. रुहिना मयेर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व प्राद्यापक वर्ग विद्यार्थी प्रतिनिधी ऋत्विक मोरे सहाय्यक भगवान मुकादम व संपूर्ण टीमने परिश्रम घेत यशस्वी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पूर्वा शिंदे व कांचन जाधव तर आभार सुप्रिया सुर्वे व अमृता साळवी यांनी केले.
........................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256 / 9529501121

Comments
Post a Comment