गांधीनगर व्यापारपेठेमध्ये कन्नड फलकांना करवीर शिवसेनेच्या वतीने काळे फसण्यात आले. यापुढे कन्नड फलक आढळले तर संबंधित दुकान मालकांनाच काळे फासू- राजू यादव,शिवसेना करवीर तालुका प्रमुख


(छाया - तय्यब अली)

 कोल्हापूर :- कन्नडीकांनी शिवसेनेचे बेळगाव जिल्हाप्रमुख यांच्या वाहनावर केलेला भ्याड हल्ला, महाराष्ट्राच्या फलकाची तोडफोड, तसेच मराठी भाषिकांच्या दुकानावरील मराठी फलकाची विटंबना केल्याच्या निषेधार्थ करवीर शिवसेनेच्यावतीने करवीर तालुकाप्रमुख राजू यादव यांच्या नेतृत्वाखाली पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी व्यापारपेठ असलेल्या गांधीनगर येथील कन्नड फलकांना काळे फासून कन्नडीकांना जशास तसे उत्तर देण्यात आले. शिवसैनिकांच्या दणक्याने इतर व्यवसायिकांनी तात्काळ आपले कानडी फलक उतरून सीमाभागातील मराठी भाषिकांच्या पाठीशी असल्याचे दाखवून दिले. यावेळी  "कन्नडीकांचा धिक्कार असो", "कर्नाटकातील भाजप सरकारचा निषेध असो" या घोषणा देऊन शिवसैनिकांनी परिसर दणाणून सोडला. 

     तसेच पोलिसांनीही तात्काळ असे कन्नड फलक उतरवण्याच्या नोटीसा संबंधित व्यवसायिकांना बजावाव्यात. अन्यथा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याला पोलिस व व्यापारी जबाबदार राहतील असा इशारा शिवसेना करवीर तालुका प्रमुख राजू यादव यांनी दिला.


    यावेळी करवीर तालुका प्रमुख राजू यादव, उपतालुका प्रमुख दीपक पाटील, कामगार सेना जिल्हाप्रमुख राजू सांगावकर, युवासेनेचे सागर पाटील, संतोष चौगुले, दीपक पोपटानी, दीपक अंकल, सुनील पारपाणी, वीरेंद्र भोपळे, खेताजी राठोड, बाबुराव पाटील, शिवाजी लोहार यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


2.5 लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते
24x7 
www.freshnewz.in
freshnewskop24@gmail.com

Freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी    पत्रकार होण्यासाठी  कॉल करा 

9529501121


Comments