राजापूर अर्बन बँकेत कोकणातील पहिली सायबर सुरक्षा यंत्रणा




राजापूर अर्बन बँकेत कोकणातील पहिली सायबर सुरक्षा यंत्रणा


रत्नागिरी : सायबर हल्ल्यांपासून निर्माण होणारा धोका रोखण्यासाठी राजापूर अर्बन बँकेने 'सिक्युरिटी इन्फर्मेशन इव्हेंट मॅनेजमेन्ट' ही नवीन टेक्नॉलॉजी स्वीकारली आहे. त्याद्वारे डाटा सुरक्षिततेबाबत विशेष खबरदारी घेतली जाणार आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या या यंत्रणेमुळे संभाव्य सायबर हल्ल्यापासून राजापूर अर्बन बँकेचा डाटा आता अधिक सुरक्षित झाला आहे, अशा प्रकारची अत्याधुनिक सायबर सुरक्षा प्रणाली वापरणारी ५०० कोटीपर्यंत व्यवहार करणाऱ्या सहकारी व अर्बन बँकांमधील राजापूर अर्बन बँक ही कोकणातील पहिली बँक ठरली आहे. याबाबतची सविस्तर माहिती राजापूर अर्बन बँकेचे अध्यक्ष जयंत अभ्यंकर आणि मुख्य कार्यकारी अधिकारी शेखरकुमार अहिरे यांनी दिली. नवीन सायबर सुरक्षा प्रणालीला संचालक मंडळाच्या सभेमध्ये मंजुरी दिली. नव्या आर्थिक वर्षामध्ये ती कार्यान्वित होणार आहे. यामुळे बँकेच्या कामकाजात अधिक सुरक्षितता आणि गतिमानता येणार असल्याचा विश्वावस त्यांनी यावेळी व्यक्त केला.


.......................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256  / 9529501121

Comments