*माजी विधान परिषद आमदार अॅड.सौ.हुस्नबानू खलिफे यांच्या प्रयत्नाने पुल उभारणी व पुल दुरुस्त्यांच्या कामांसाठी कोट्यावधी रुपयांचा निधी मंजूर*

 माजी विधान परिषद आमदार अॅड.सौ.हुस्नबानू खलिफे यांच्या प्रयत्नाने पुल उभारणी व पुल दुरुस्त्यांच्या कामांसाठी कोट्यावधी रुपयांचा निधी मंजूर*




रत्नागिरी प्रतिनिधी:-

राजापूरातील कॉंग्रेस नेत्या, माजी विधान परिषद आमदार अॅड.सौ.हुस्नबानू खलिफे यांच्या विशेष प्रयत्नाने तालुक्यातील ग्रामीण भागातील पुलांच्या कामांना कोट्यावधी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. राज्यात महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर माजी विधान परिषद आमदार अॅड.सौ.हुस्नबानू खलिफे ग्रामीण भागातील विविध विकास कामांसाठी निधी उपलब्ध व्हावा यासाठी सतत मंत्री व संबंधीत मंत्रालयातील कार्यालयांमध्ये पाठपुरावा करित आहेत. या पाठपुराव्याला यश आले आहे. मात्र असे असले तरी देखील सध्या सोशल मिडियावर श्रेयवाद नेहमी प्रमाणेच निर्माण झाला आहे. मात्र असे असले तरिही माजी विधान परिषद आमदार अॅड.सौ.हुस्नबानू खलिफे यांनी निधी उपलब्ध करुन दिल्याबद्दल ग्रामस्थांमधून आभार व्यक्त केले जात आहेत.

राजापूरातील दांडे-अणसुरे या पुलाच्या दुरुस्तीसाठी फडणवीस सरकारच्या काळात सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी या पुलासाठी पाच कोटी रुपये दिले होते. आता विद्यमान सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी या पुलासाठी दहा कोटींचा निधी मंजूर केला आहे. सावडाव शेलारवाडी हातदे येथे पुलासाठी ३ कोटी ८८ लाख रुपये मंजूर झाले आहेत. केळवली जवळेथर रस्त्यावरील नादुरुस्त कॉजवेच्या ठिकाणी पुलाची उभारणी करण्यासाठी १ कोटी २५ लाख रुपये निधी मंजूर झाला आहे. राजापूर-बुरंबेवाडी रस्त्यावरील धोपेश्वर खांबलवाडी येथे अरुंद पुलाच्या रुंदीकरणासाठी १ कोटी २५ लाख रुपये निधी मंजूर झाला आहे. साटवली पावस रस्त्यावर कमकुवत पुलाची पुनर्बांधणी करण्यासाठी २ कोटी ५० लाख रुपये निधी मंजूर झाला आहे. राजापूर तालुक्यात ग्रामीण भागात एवढा निधी मंजूर झाल्याबद्दल माजी विधान परिषद आमदार अॅड.सौ.हुस्नबानू खलिफे यांचे आभार व्यक्त करण्यात येत आहेत.


........................................

२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256  / 9529501121




Comments