पाली पोलीसांकडून मद्यपी चालकावर कारवाई
रत्नागिरी:- मुंबई – गोवा महामार्गावर पाली पोलीस दुरक्षेत्राच्या पोलीस कर्मचा-याकडून वाहतुकीचे नियमन करीत असताना भरधाव वेगाने बेदरकारपणे कंटेनर चालवित येणा-या चालकाची मद्यपान करुन वाहन चालवित असल्याबाबत वैद्यकिय चाचणी करुन रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाणे अंतर्गत पाली पोलीस दुरक्षेत्रात गुन्हा दाखल करण्यात आला.याबाबत पाली पोलीस दुरक्षेत्रातून मिळालेली माहिती अशी की, मुंबई – गोवा महामार्गावर पाली पोलीस दुरक्षेत्राच्या पोलीस कर्मचा-याकडून वाहतुकीचे नियमन करीत असताना कोल्हापूर ते मुंबई जात असताना भरधाव वेगाने बेदरकारपणे कंटेनर क्र. (एमएच ४३ यु ५७०९) चालवित येणा-या चालक दत्तात्रय किशन निमगारे (वय ३८ रा. सांगोला) मद्यपान केले असल्याच्या संशयावरुन पाली ग्रामीण रुग्णालय येथे वैद्यकिय चाचणी करुन त्याचा सकारात्मक अहवाल आल्याने या चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई पाली पोलीस दुरक्षेत्राचे पोलीस हेड कॉन्स्टेबल विजय चावरे, स्वाती राणे, पोलीस नाईक तटकरी, पोलीस कॉन्स्टेबल सुमित चिले यांनी केली. चालक दत्तात्रय निमगारे याला न्यायालयात हजर केले असता दोन हजार रुपयांचा दंड न्यायालयाकडून ठोठावण्यात आला.

........................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256 / 9529501121
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा