वीज मीटर घोट्याळाची खातेनिहाय चौकशी करावी

 *वीज मीटर घोट्याळाची खातेनिहाय चौकशी करावी -गौस खतीब यांची मागणी*




खेड -प्रतिनिधी (मंदार आपटे)

सध्या खेड शहरात महावितरण चा विजेचा खेळ खंडोबा चालू असताना कोरोना च्या काळात आलेली वाढीव बिले यासह चक्री वादळात अनेक लोकच नुकसान झालेलं असताना लोकांना अव्वाच्या सव्वा आलेली  वीज बिलाची रक्कम वसुली करण्यात येते.ती थाबववली पाहिजे.यासह नवीन वीज मीटर जोडणी साठी मीटरच उपलब्द नसल्याची बाब श्री खतीब यांनी समोर  आणली आहे.

नवीन जोडणीचे कोटशन काढा. पैसे भरा .हे सारे ग्राहक करतात पैसे भरून झाल्यावर महावितरण अधिकारी सांगतात की मीटर शिल्लक नाही .मग जर मीटर शिल्लक नसतील तर लोका कडून पैसे का भरून घेता असा सवाल श्री खतीब यांनी उपस्थित केला.महावितरण  ठेकेदार व महावितरणचे अधिकारी यांच्यात फार मोठा घोटाळा असल्याचा आरोप खतीब यांनी केला आहे .लोकांना होण्यारा या त्रासाबद्दल आपण लवकर ऊर्जामंत्री यांना भेटून तक्रार करणार असल्याचे कॉग्रेस चे तालुका अध्यक्ष श्री गौस खतीब यांनी सांगितले. कोकणात महावितरण ची वसुली चांगली आहे लोक अधिकारांना चांगली वागणूक देतात मग लोकांना महावितरण वीज  मीटर का देत नाही   गेल्या वर्ष भरात शंभर मीटर महावितरण देऊ शकली नाही हे दुर्दैव आहे .याबाबत आपण लवकरच ऊर्जामंत्री ना भेटून हा विषय निकाली काढू व विजेच्या लपंडाव का होतो यांचा ही जाब आपण विचारनार आहोत असे खतीब म्हणाले.

........................................

२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256  / 9529501121





Comments