बुमराह आणि संजनाच्या विवाहसोहळ्यानं क्रीडा रसिकांचं लक्ष वेधलं.

 भारतीय क्रिकेट संघातील आघाडीचा गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि संजना गणेशन यांच्या विवाहसोहळ्याचीच चर्चा मागील आठवडाभरापासून सुरु आहे. खासगी कारणांसाठी म्हणून जसप्रीतनं बीसीसीआयकडून सुट्टी घेतल्या क्षणापासून त्याच्या आणि संजनाच्या विवाहसोहळ्यानं क्रीडारसिकांचं लक्ष वेधलं.

अतिशय खासगी स्वरुपातील विवाहसोहळ्यात जसप्रीत आणि संजना यांची लग्नगाठ बांधली गेली. साता जन्माच्या नात्यात हे दोघं बांधले गेले आणि तिथं सोशल मीडियावर त्यांच्या या विवाहसोहळ्यातील फोटोंना कमालीचं उधाण आलं

गोव्यात अवघ्या 20 पाहुण्यांच्या उपस्थितीत जसप्रीत आणि संजना विवाहबंधनात अडकले. पण, तरीही विवाहसोहळ्याची रंगत काही कमी नव्हती हे सोशल मीडियावरील काही फोटो सांगूनच जात आहेत. सध्या याच दिमाखदार विवाहसोहळ्यातील काही व्हिडीओही समोर आले आहेत. यापैकी एका व्हिडीओमध्ये जसप्रीत आणि संजना एकमेकांना पुष्पहार घालताना दिसत आहेत. इथं बुमराहची त्याच्या पत्नीवरुन नजरच हटत नसल्याचे गोड क्षणही पाहायला मिळत आहेत

 

Comments