सरकारपेक्षा भिन्न मत व्यक्त करणं म्हणजे देशद्रोह नाही?!- सुप्रीम कोर्ट
सरकारपेक्षा भिन्न मत व्यक्त करणं म्हणजे देशद्रोह नाही?!- सुप्रीम कोर्ट
सरकारचं मत आहे त्याच्या अगदी भिन्न मत व्यक्त करणं म्हणजे देशद्रोह ठरत नाही असं सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे. सुप्रीम कोर्टाने जम्मू काश्मीरचे खासदार फारुख अब्दुल्ला यांच्याविरोधात दाखल देशद्रोहाची याचिका फेटाळून लावताना हे मत नोंदवलं आहे. “सरकारच्या मतांपेक्षा भिन्न मत व्यक्त करणं याला देशद्रोह म्हटलं जाऊ शकत नाही,” असं सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे.
क्लिक करा आणि वाचा:महिलांसाठी मोफत व्हिडीओ एडिटिंग कोर्स
जम्मू काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारं ३७० कलम ऑगस्ट २०१९ मध्ये रद्द करण्यात आल्यानंतर फारुख अब्दुल्ला यांनी भारताविरोधात पाकिस्तान आणि चीनकडूम मदत घेतल्याचा आरोप करण्यात आला होता. मात्र आरोप सिद्ध करणारा कोणताही पुरावा याचिकाकर्ता सादर करु शकला नाही. सुप्रीम कोर्टाने याचिकाकर्त्याला ५० हजारांचा दंडदेखील ठोठावला आहे.
क्लिक करा आणि वाचा:शिवसेनेचा वाघ पिंजऱ्यात अडकलाय; CM उद्धव ठाकरे मवाळ झालेत!'-रामदास आठव
नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला यांच्याविरोधात करण्यात आलेल्या याचिकेत त्यांनी केलेल्या वक्तव्यांचा दाखला देण्यात आला होता. कलम ३७० रद्द करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयावर फारुख अब्दुल्ला यांनी टीका केली होती. त्याच्याच आधारे ही याचिका करण्यात आली होती. मात्र सुप्रीम कोर्टाने ही याचिका फेटाळून लावली.
क्लिक करा आणि वाचा: फडणवीस सरकारच्या काळातील ५० कोटी वृक्ष लागवडीची होणार चौकशी !
..........................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुपऑनलाईन व प्रिंट मीडिया
.........................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.........................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक RNI- MAHMAR/2011/39536
...........................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256 / 9529501121

Comments
Post a Comment