महापालिका क्षेत्रात जेष्ठ नागरिकांना कोरोना लसीकरण सुरू:-


मिरज: (प्रतिनिधी )

ज्यांचे वय 45 ते 59 च्या दरम्यान आहे मात्र इतर आजार आहेत अशा नागरिकानासुद्धा कोविडची लस देण्यात येणार  आहे.

सांगली मिरज आणि कुपवाड शहर महापालिका क्षेत्रात 1 मार्च 2021 पासून  60 वर्षावरील जेष्ठ नागरिक आणि ज्यांचे वय 45 ते 59 च्या दरम्यान आहे, मात्र इतर आजार असलेल्या सर्व नागरिकाना कोविडची लस देण्यात सुरवात केली आहे. यासाठी महापालिका आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे. अशी माहिती

महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी दिली. यामध्ये ज्या नागरिकाचे वय 45 ते 59 आहे मात्र त्यांना इतर आजार आहेत अशा नागरिकांनी रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिसनरचे सर्टिफिकेट सोबत आणावे तसेच जे नागरिक 60 वर्षवरील आहेत त्यांना सर्टिफिकेटची गरज नाही  मात्र सर्वानी त्यानी सोबत आयडी प्रूफ घेऊन येणेचे आहे. महापालिकेच्या 10 हेल्थ पोस्ट मध्ये कोविड लस दिली जाणार असून जेष्ठ नागरिक आणि इतर आजार असणारे 45 ते 59 वयाच्या नागरिकांचे स्पॉट रजिस्ट्रेशन करून किंवा ऑनलाइन रजिस्ट्रेशन (कॉविन अँप वर) कोविड लस देणेत येणार आहे. याचबरोबर शासकीय योजना असलेल्या खाजगी  हॉस्पिटलमध्येच आता कोविड लसीकरण केंद्र असणार आहे तसेच ते सशुल्क असणार आहे मात्र फक्त मनपा आरोग्य केंद्र  व  सिव्हिल हॉस्पिटलमध्ये लस मोफत दिली जाणार आहे. ज्यांचा दुसरा डोस असेल त्यानी महापालिका आरोग्य केंद्र किंवा सांगली/मिरज सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जाऊन घेणेचे आहे असे आवाहनही आयुक्त नितीन कापडणीस यांनी केले आहे.

Comments