परुळेतील विहिरीत पडला बिबट्या

 परुळेतील विहिरीत पडला बिबट्या



वेंगुर्ले।प्रतिनिधी

तालुक्यातील परुळे बाजार येथे भक्ष्याच्या शोधात असलेला बिबट्या विहिरीत पडला. हा प्रकार मंगळवारी पहाटे घडला. वन विभागाने त्याला सुरक्षित बाहेर काढून नैसर्गिक अधिवासात सोडले.तालुक्यातील परुळे बाजारवाडी येथील मनोहर सावळाराम सावंत यांच्या घरालगत विहिरीमध्ये भक्ष्याच्या शोधात असलेला बिबट्या अंदाज न आल्यामुळे विहिरीत पडला.


सकाळी पाणी भरण्यासाठी गेलेल्या ग्रामस्थांना तो दिसला. त्यांनी वन विभागाला कळविले. त्यांचे बचाव पथक येण्यापूर्वी दोरखंडाच्या साहाय्याने लाकडीफळी विहिरीत सोडण्यात आली होती. त्यावर बिबट्या बसून राहिला. बचाव पथक येताच ग्रामस्थांच्या मदतीने बिबट्याला पिंजऱ्याच्या साहाय्याने २५ ते ३० फूट खोल विहिरीतून सुखरूप बाहेर काढण्यात आले. हा बिबट्या नर असून अंदाजे तीन ते साडेतीन वर्षांचा असल्याचे कुडाळ पशुवैद्यकीय अधिकारी सचिन घालवडकर यांनी सांगितले.


गेले काही दिवस परुळे परिसरात बिबट्याची दहशत होती. त्याने अनेक पाळीव प्राण्यांवर हल्ले केले होते. विहिरीतील बिबट्याला पाहण्यासाठी बघ्यांनी गर्दी केली होती. कुडाळ वनक्षेत्रपाल अमृत शिंदे ,कणकवली वनक्षेत्रपाल रमेश कांबळे ,निवती पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक साळुखे ,नेरूर वनपाल धु .रा .कोळेकर ,मठ वनपाल अ.स.चव्हाण ,वनरक्षक विष्णू नरळे ,सावळा कांबळे ,नीलम बामणे , श्री .बिकट ,परुळेबाजार सरपंच श्वेता चव्हाण , उपसरपंच विजय घोलेकर , पोलिसपाटील सुभाष घोलेकर यांनी बिबट्यासाठी मोहीम राबविली .


.........................................

२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256  / 9529501121


Comments