गळफास घेत प्रौढाची आत्महत्या



  गळफास घेत प्रौढाची आत्महत्या


रत्नागिरी : अज्ञात कारणातून घराच्या छताच्या लोखंडी हुकला नायलॉन दोरीने गळफास घेतलेल्या प्रौढाचा उपचारांदरम्यान जिल्हा शासकिय रुग्णालयात शुक्रवारी सकाळी 7.55 वा.सुमारास मृत्यू झाला. अन्वर महंमद काळसेकर (48,रा.सिध्दीविनायक नगर गोडबोले स्टॉप,रत्नागिरी) असे मृत्यू झालेल्या प्रौढाचे नाव आहे. बुधवार 24 मार्च रोजी दुपारी 3.15 ते 3.45 वा.कालावधीत घरात कोणीही नसताना अन्वर काळसेकर यांनी छताच्या लोखंडी हुकला नायलॉन दोरीने गळफास घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. तेवढ्यात त्यांचा मुलगा घरी आल्याने त्याने त्यांना तातडीने जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल केले होते. परंतू उपचारांदरम्यान शुक्रवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी अधिक तपास शहर पोलिस करत आहेत.


........................................

२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256  / 952950112


टिप्पण्या

news.mangocity.org