*रत्नागिरीत भविष्यात पाणी प्रश्न गंभीर;कीर वरिष्ठ महाविद्यालयाच्या सर्वेक्षणाचा निकष*
*रत्नागिरीत भविष्यात पाणी प्रश्न गंभीर;कीर वरिष्ठ महाविद्यालयाच्या सर्वेक्षणाचा निकष*
रत्नागिरी।प्रतिनिधी
रत्नागिरी शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन पाण्याचे नियोजन करावे लागणार आहे .त्यासाठी निर्बंध पाहिजेत अन्यथा पाणी प्रश्न गंभीर होईल .बोअरवेलसह नवीन इमारतींच्या उभारणीलाच परवानगी नाकारावी आणि रेन हार्वेस्टिंगसह सांडपाणी रिसायकलिंग प्रकल्प अत्यावश्यक आहेत.ग्राहक पंचायत आणि भारत शिक्षण मंडळाचे कीर वरिष्ठ महाविद्यालयाच्या सर्वेक्षण अहवालातून असे निष्कर्ष काढण्यात आले आहेत ,अशी माहिती अॅड.दिलीप भावे आणि प्रा . उदय बोडस यांनी दिली .
महाविद्यालयाचे विद्यार्थ्यानी ,भूगोलच्या प्राध्यापिका ऋतुजा भोवड यांच्या सहकार्याने रत्नागिरी शहरातील पाणीपुरवठा या विषयावर २८ प्रभागांतून सर्व्हे केला.एक हजार नागरिकांशी साधलेल्या संवादातून प्राप्त माहितीच्या आधारे तयार केलेला अहवाल ग्राहक पंचायत अध्यक्ष अॅड.भावे , प्रा . बोडस,विनय परांजपे ,दत्तात्रय मराठे ,पत्रकार अरविंद कोकजे,ऋतुजा भोवड यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आला.
प्रा.बोडस म्हणाले , "पिण्यासह पाण्याचा मुबलक वापर होत असल्याचे आढळले.इमारतींमधील सांडपाणी गटारात सोडले जाते .कुंड्यांमधील झाडांसाठी २५ हजार लिटर पाणी वापरतात .त्या ऐवजी ड्रेनेज पद्धतीत बदल करून सांडपाणी बागेला आणि सेप्टिक टँकचे पाणी गटारात गेले पाहिजे .त्यातून १५ हजार लिटर पाणी वाचेल . शहरात बहुमजली इमारती वाढत असल्यामुळे वर्षातील पाच महिने टँकरने पाणीपुरवठा होतो . पाण्याचे व्यवस्थापन होत नाही.अॅड.भावे म्हणाले “
शहरातील बहुतांश भागात एक दिवसाआड टँकरने पाणीपुरवठ्यासाठी मागणी केली जाते.त्यासाठी पाण्याची बचत करणारे प्रकल्प शहरात अत्यावश्यक केले पाहिजेत.मोठ्या इमारती असलेल्या भागात हे अधिक जाणवते .
या प्रभागात सर्वाधिक टंचाई
शिवाजीनगर , थिबापॅलेस , मारुती मंदिर जोड भाग , जेल रोड , जुनी तांबट आळी,गवळीवाडा ,वरची आळी ,बेलबाग,धनजीनाका ,झारणी रोड,घुडे वठार ,चवंडे वठार , चर्मालय ,विवेकानंद रोड , क्रांतीनगर ,अभ्युदय नगर या शहरातील ११ प्रभागात वर्षभर पाण्याचा प्रश्न उद्भवतो.
........................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256 / 9529501121

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा