योगासन स्पर्धेत यशस्वी झालेल्या विध्यार्थीचे वैभव खेडेकर यांनी केला सत्कार
योगासन स्पर्धेत यशस्वी झालेल्या विध्यार्थीचे वैभव खेडेकर यांनी केला सत्कार
खेड:-राज्यस्तरीय योगासन स्पर्धेत देशात सर्वाधिक सहभाग नोंदविणार्या महाराष्ट्र संघाने राष्ट्रीय स्पर्धेतही यशाची पताका फडकाविली आहे. गेले चार दिवस ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आलेल्या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राच्या संघाने २४ गुणांसह तीन सुवर्ण आणि तीन रौप्य पदकांची कमाई करीत संपूर्ण स्पर्धेवर राज्याची छाप सोडली.राष्ट्रीय योगासन स्पोर्टस् फेडरेशनने गेल्या २४ ते २७ मार्चदरम्यान ‘ऑनलाईन’ पद्धतीने राष्ट्रीय योगासन स्पर्धेचे आयोजन केले होते. गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये क्रिडा मंत्रालयाने योगासनांना खेळाचा दर्जा दिल्यानंतर पहिल्यांदाच या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. सहा गटांमध्ये घेण्यात आलेल्या योगासनांच्या विविध प्रकारांमध्ये त्रिपूरा राज्य व मध्यप्रदेशच्या संघाने प्रत्येकी एक रौप्य, पश्चिम बंगालच्या संघाने दोन कांस्य, तर हरियाणा व तेलंगणा येथील संघाने प्रत्येकी एका कांस्य पदकाची कमाई केली. ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आलेल्या या पहिल्याच स्पर्धेला देशभरातील विविध राज्यांच्या संघांचा मोठा प्रतिसाद मिळाला.योगासनांच्या विविध कठीण मुद्रा सादर करीत मुलांच्या लहानगटात महाराष्ट्राच्या संघातील कु. प्रित निलेश बोरकरने 74.33 गुणांसह सुर्वणपदक मिळविल्याबदल त्यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे सत्कार करतांना पक्षाचे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस तथा खेड नगर परिषदेचे नगराध्यक्ष श्री वैभव खेडेकर साहेब, मा. गटनेते/ नगरसेवक अजय माने, मनसे खेड शहर उपाध्यक्ष रविंद्र उर्फ बाबू नांदगांवकर, सांस्कृतिक सेनेचे तालुका अध्यक्ष विनय माळी, मनविसे तालुकाध्यक्ष प्रसाद शेट्ये,दादु नांदगांवकर,रुपेश पाटणे, व ईतर मान्यवर उपस्थित होते .
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256 / 952950112

Comments
Post a Comment