दुकानाची वाट अडवल्या प्रकरणी गुन्हा दाखल
रत्नागिरी:-शहरातील एम.जी.रोड येथील दुकानाची वाट साईन बोर्ड आणि चिरे लावून अडवल्याप्रकरणी दोघांविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही घटना रविवार 21 मार्च रोजी दुपारी 3.15 वा.सुमारास घडली आहे.अनिकेत पवार(रा.काँग्रेस भुवन, रत्नागिरी) आणि निखिल चव्हाण (रा.क्रिस्टल बिल्डिंग भाजी मार्केट, रत्नागिरी) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताची नावे आहेत.त्यांच्याविरोधात अनिकेत यशवंत पाध्ये (32,रा.एम.जी.रोड, रत्नागिरी) यांनी शहर पोलिसांकडे तक्रार दिली आहे.त्यानूसार, रविवारी दुपारी संशयितांनी पाध्ये यांच्या यश इलेक्ट्रॉनिक्स दुकानासमोरील उभ्या पोलला साईन बोर्डचा पत्रा नायलॉन दोरीने बांधून त्या पलीकडे चिरे लावून त्यांच्या येण्याजाण्याची वाट अडवली आहे.याप्रकरणी अधिक तपास पोलिस हेड काँस्टेबल हरचकर करत आहेत.
........................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256 / 9529501121
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा