बनावट पॅन कार्डद्वारे मोबाईल खरेदी करणारी टोळी रत्नागिरीत कार्यरत!


 

बनावट पॅन कार्डद्वारे लोन करून मोबाईल खरेदी करणारी टोळी रत्नागिरीत कार्यरत


रत्नागिरी:बनावट पॅन कार्ड व आधार कार्ड चा वापर करीत रत्नागिरीतील विविध मोबाईल दुकानातून लोनवर मोबाईल खरेदी करीत दुकानदारांना चुना लावण्याच्या घटना रत्नागिरीत उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. सध्या बजाज फायनान्स कंपनी द्वारे रत्नागिरीतील अनेक मोबाईल विक्रेते सुलभ हप्त्यांवर ग्राहकांना मोबाईल देतात. अनेकजण या सुविधेचा फायदा घेत महागडे मोबाईल खरेदी करतात. यासाठी दुकानदार संबंधित ग्राहकाकडून पॅन कार्ड व आधारकार्ड झेरॉक्स घेतात व सीबील स्कोअर चेक करून त्या ग्राहकाला सुलभ हप्त्यांवर मोबाईल दिला जातो. मात्र काही भामट्यानी दुसऱ्या नावाची ड्युप्लिकेट पॅन कार्ड बनवून त्यावर आपला फोटो लावून रत्नागिरीतील अनेक दुकानातून महागडे मोबाईल खरेदी केल्याच्या घटना आता उघडकीस येऊ लागल्या आहेत. लोनवर देण्यात आलेल्या मोबाईलचा पहिला हप्ता थकल्यावर ही बाब दुकानदारांच्या लक्षात आली आहे. मोबाईल हप्त्यांवर देताना ग्राहकाने हप्ते वेळेवर न भरल्यास त्या दुकानदाराला ते हप्ते भरावे लागत असल्याने आता ही घटना घडल्यावर फायनान्स कंपनीने देखील आपले हात वर केले आहेत. अशा पद्धतीने दुकानदारांना गंडा घालणारी ही टोळी रत्नागिरीत कार्यरत झाली असून त्यांनी गंडा घातलेल्या काही घटना आता उघडकीस आल्या आहेत. या मोबाईल दुकानदारांनी या विकलेल्या मोबाईलचा आय एम ई नंबर द्वारे तपास केला असता हे मोबाईल परराज्यात ऍक्टिव्हेट असल्याचे दिसत आहे. आता या फसलेल्या दुकानदारांनी पोलिसांत धाव घेतली असून अजून काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.





..........................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.........................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.........................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक RNI- MAHMAR/2011/39536
...........................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256  / 9529501121

टिप्पण्या

news.mangocity.org