*रत्नागिरीतील कुवारबाव परिसरातील अतिक्रमणे हटविण्यास सुरुवात*
*रत्नागिरीतील कुवारबाव परिसरातील अतिक्रमणे हटविण्यास सुरुवात*
रत्नागिरी प्रतिनिधी:-
रत्नागिरीतील मि-या-नागपूर महामार्गालगत कुवारबाव, जे.के.फाईल्स स्टॉप एम.आय.डी.सी परिसरात मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण करुन गाळे उभारण्यात येत होते. ते गाळे हटविण्यास सुरुवात झाली. यासंबंधी वेळोवेळी हे अनधिकृत गाळे हटविण्यात यावेत अशी मागणी होत होती. यासंदर्भात राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री व रत्नागिरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार उदय सामंत यांनी जिल्हाधिकारी व प्रांताधिकारी यांना हे महामार्गालगत असणारे अनधिकृत गाळे व अन्य काही बांधकामे त्वरित हटविण्यात यावीत अशा सुचना दिल्या होत्या. मात्र अधिवेशन काळ सुरु असल्याकारणाने हे गाळे हटविण्याची मोहीम सुरु करण्यात आली नव्हती. मात्र शुक्रवारी १२ मार्च पासून पोलिस बंदोबस्तात महसूल विभाग, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे अधिकारी यांच्या पथकाच्या निरिक्षणाखाली, तहसीलदार शशिकांत जाधव यांच्या उपस्थितीत जे.सी.बी.च्या सहाय्याने अनधिकृत गाळे हटविण्यास सुरुवात झाली आहे. जिल्हा प्रशासनाने घेतलेल्या या भूमिकेबाबत आता अनधिकृत बांधकामे करणा-यांना चांगलीच जरब बसणार आहे.
........................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256 / 9529501121

Comments
Post a Comment