लोटे एमआयडीसीतील घरडा कंपनीत भीषण स्फोट; तिघांचा जागीच मृत्यू
चिपळूण:- लोटे एमआयडीसीतील घरडा कंपनीत आज सकाळी प्रचंड मोठा स्फोट झाला. या अपघातात तब्बल सहा जण गंभीररित्या भाजले. यातील तिघांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, मात्र अपघाताची माहिती मिळताच परिसरात नागरिकांची मोठी गर्दी झाली आहे.शनिवारी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास हा स्फोट झाला. घरडा कंपनीच्या प्लँट नं. ७ बी येथे मटेरियल चार्जिंग करणाऱ्या रिॲक्टरमध्ये स्फोट झाला, असा प्राथमिक अंदाज आहे. या स्फोटामुळे आग लागली आणि तेथे काम करणाऱ्यां कर्मचाऱ्यांपैकी तिघेजण जळून जागीच ठार झाले. त्यांचे चेहरे पूर्ण भाजले असल्याने त्यांची ओळख पटली नव्हती. अन्य तिघेजण अतिगंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी ऐरोली येथे हलवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
........................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256 / 9529501121
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा