महावितरण कर्मचाऱ्याला मारहाण करणाऱ्यास पोलिसांनी केली अटक
महावितरण कर्मचाऱ्याला मारहाण करणाऱ्यास पोलिसांनी केली अटक
चिपळूण : कावीळतळी येथील मनोहर प्लाझा येथे ३८००० वीजबिल वसुलीसाठी गेलेल्या महावितरण कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याची घटना घडली असून पोलिसांनी मारहाण करणाऱ्या इसमावर सरकारी कामात अडथळा केल्याप्रकरणी गुन्हा दखल केला आहे. सध्या मोठ्या थकबाकीचे प्रमाण खूपच जास्त असल्याने महावितरण कंपनी आर्थिक संकटात आहे अशा परिस्थितीत ग्राहकांनी वीज बिल भरून सहकार्य करणे आवश्यक आहे असे आवाहन महावितरण कडून करण्यात आलं आहे. या पूर्वी सुद्धा अशा घटना मधील आरोपींना गंभीर शिक्षा झाल्या असल्याने अशा कृत्यांना न घाबरता कंपनीचे काम चालू ठेवावे, प्रशासन खंबीरपणे कामगार व अधिकाऱ्यांसोबत आहे तसेच ग्राहकांनी कायदा हातात घेऊ नये व वीज बिलाविषयी तक्रारी असल्यास विहित मार्गाने मांडल्यास त्याचे नक्कीच निवारण केले जाते . महावितरण ही जनतेची स्व तची कंपनी असून वीज ग्राहकांनी वीज बिल भरणा करून सहकार्य करावे असे आवाहन महावितरणने केले आहे.
........................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256 / 952950112

Comments
Post a Comment