*नगरपालिका इमारत नूतनीकरणाचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात*

 नगरपालिका इमारत नूतनीकरणाचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात



रत्नागिरी :स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये धोकादायक ठरलेल्या रत्नागिरी नगरपालिकेच्या आधुनिक इमारतीचे स्वप्न लवकरच पूर्ण होईल ,अशी आशा निर्माण झाली आहे.या इमारतीसाठी पाच कोटी रुपये मंजूर असून वर्कऑर्डरसाठीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे.महिन्याभरात नगरविकास विभागाकडून पत्र प्राप्त झाल्यानंतर निविदा प्रक्रिया केली जाणार आहे.


रत्नागिरी पालिकेच्या इमारतीला सुमारे ४८ वर्षे होऊन गेली आहेत.१६ मे १९७१ रोजी तत्कालीन आमदार शामराव पेजे यांच्या हस्ते या इमारतीचे उद्घाटन झाले होते.पुणे येथील केबीपी सिव्हिल इंजिनिअरिंग सर्व्हिसने   केला केलेल्या स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये ही इमारत वापरास अयोग्य असल्याचे सांगितले होते.  त्यानंतर नवीन इमारतीचा प्रस्ताव तयार आहे.तीन मजली अद्ययावत इमारत उभारण्याचा आराखडा तयार केला असून सर्वात वरच्या मजल्यावर नागरिकांसाठी रत्नागिरी दर्शनासाठी स्पेशल गॅलरीही तयार केली जाणारआहे.नगराध्यक्ष दालनासह सभागृह,सभापती दालने,विविध विभागांसाठी स्वतंत्र खोल्या,मुख्याधिकारी दालन, विषय समित्यांच्या बैठकांसाठी दालने ,विश्रांतीगृह, स्वागत कक्ष,लिपमट आदींचा समावेश आहे. 


जिन्याचा स्लॅब पडण्याची भीती इमारत जीर्ण झाल्यामुळे निर्माण झाली आहे .इमारतीच्या सर्वात वरील मजल्यावर नगराध्यक्षांचे दालन आहे .या दालनावरील छप्परही लिकेज झाले असल्याने पावसाळ्यात तिथे बसणे अडचणीचे होते . तात्पुरती दुरुस्ती केली आहे .उपनगराध्यक्ष ,पाणी सभापती वगळता अन्य सभापतींसह सदस्यांसाठी इमारतीत कक्ष नाही .दुसऱ्या मजल्यावरील गॅलरीतील बांधकामही निखळले असून अनेक ठिकाणी स्लॅबला भेगा गेल्या आहेत.प्लॅस्टरच निखळल्याने आतील लोखंडी सळ्या बाहेर लटकत आहेत . दर्शनी भागातील जिन्याचा स्लॅब पडण्याची भीतीही निर्माण झाली आहे .

.........................................

२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256  / 9529501121



Comments