१० रुपयांच्या प्लॅटफॉर्म तिकीटासाठी आता मोजा ३० रुपये!

 



१० रुपयांच्या प्लॅटफॉर्म तिकीटासाठी आता मोजा ३० रुपये!

- भारतीय रेल्वेकडून प्लॅटफॉर्म तिकीटांच्या दरात वाढ!
- लोकल रेल्वेच्या भाड्यातही वाढ
- १० रुपयांच्या तिकिटासाठी प्रवाशांना मोजावे लागणार ३० रुपये
- रेल्वे स्टेशनवर १० रुपयांच्या प्लॅटफॉर्म तिकीटासाठी आता मोजावे लागणार ३० रुपये!

मुंबई:भारतीय रेल्वेकडून प्लॅटफॉर्म तिकीटांच्या दरात वाढ करण्यात आल्याची घोषणा करण्यात आलीय. १० रुपयांना मिळणाऱ्या प्लॅटफॉर्म तिकिटासाठी आता प्रवाशांना तीन पट जास्त अर्थात ३० रुपये मोजावे लागणार आहेत. सोबतच, लोकल रेल्वेच्या भाड्यातही वाढ करण्यात आली आहे. १० रुपयांना मिळणारं तिकीट यापुढे ३० रुपयांना मिळणार आहे.
फेब्रुवारी महिन्यात कमी अंतराच्या प्रवाशांच्या गाड्यांच्या तिकीट दरात वाढ झाल्यानंतर आता ही दुसऱ्यांदा वाढ करण्यात येतेय. करोना काळात अनावश्यक प्रवासाला आळा घालण्यासाठी 'किंचित भाडेवाढ' केल्याचं स्पष्टीकरण यावेळी रेल्वे प्रशासनानं दिलं होतं.
यापूर्वी रेल्वेकडून १ जानेवारीपासून उपनगरी गाड्या वगळता इतर रेल्वेच्या भाड्यात वाढ केली होती. यामुळे, उपनगरी भाड्यांचे दर बदललले नसले तरी सामान्य बिगर-एसी, बिगर-उपनगरी रेल्वेच्या भाड्यात प्रति किमी प्रवासासाठी १ पैसा वाढ झाली होती. त्यानंतर रेल्वेकडून मेल, एक्स्प्रेस नॉन-एसी रेल्वे गाड्यांच्या भाड्यात दोन पैसे प्रती किमी तसंच एसी वर्गांच्या भाड्यात चार पैसे प्रती किमी वाढ जाहीर करण्यात आली होती.

                


                  करोना लॉकडाऊन काळात रेल्वेकडून काही विशेष रेल्वेंची संख्या वाढवण्यात आली आहे. सुरुवातील लांब पल्ल्याच्या गाड्यांनंतर कमी अंतराच्या प्रवासी गाड्याही 'विशेष रेल्वे' म्हणून रुळावर परतल्या आहेत. ही भाडेवाढ शताब्दी, राजधानी आणि दुरांतो या प्रीमियम गाड्यांनाही लागू आहे.

मुंबईत १० रुपयांचं प्लॅटफॉर्म तिकीट ५० रुपयांना
करोनाकाळात रेल्वे स्थानकांवर गर्दी होऊ नये, यासाठी रेल्वे प्रशासनानं प्लॅटफॉर्म तिकीट देणं बंद केलं होतं. परंतु, वयोवृद्ध आणि दिव्यांग प्रवाशांना स्टेशनवर सोडण्यासाठी येणाऱ्या नातेवाईकांसाठी मुंबई विभागातील सात महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीट पुन्हा सुरू करण्यात आलंय. या तिकीटाचे दर ३० रुपयांवरून ५० रुपयांवर नेण्यात आले आहेत. या रेल्वे स्थानकांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस, ठाणे, कल्याण, पनवेल आणि भिवंडी रोड या स्थानकांचा समावेश आहे. दुसरीकडे, रेल्वे प्रशासनाकडून करोनाच्या नावाखाली रेल्वे प्रवाशांची लूट सुरू असल्याचा आरोप प्रवासी संघटनांनी केला आहे.

.........................................
२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256  / 9529501121

Comments