रोहिदास-रविदास समाज माता-पिता,बंधू-भगिनी यांच्या सर्वांगीण विकासासाठी कायम कटीबद्ध राहणार : जिल्हाध्यक्ष श्री संजय निवळकर

 रोहिदास-रविदास समाज माता-पिता,बंधू-भगिनी यांच्या सर्वांगीण विकासासाठी कायम कटीबद्ध राहणार : जिल्हाध्यक्ष श्री संजय निवळकर





समाजबांधवांनी संघटीत होणे काळाची गरज


रत्नागिरी:-रोहिदास व रविदास समाज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात विस्तारलेला आहे. काही विकासात्मक गोष्टींपासून आमचा हा समाज वंचित राहिला आहे. काही ठिकाणी समाजातील भगिनींना विकृतांच्या अन्यायाला सामोरे जावे लागत आहे. या अन्यायाविरुद्ध आवाज उठविण्यासाठी आणि समाजाच्या कल्याणासाठी समाजबांधव या नात्याने कायम कटीबद्ध आहे असे मत जिल्हाध्यक्ष संजय निवळकर यांनी व्यक्त केले. आपल्या समाजातील विविध व्यक्ती समाजपयोगी कार्य करून  नावारूपाला आलेल्या आहेत. परंतु आताच्या परिस्थितीत समाजाचा विकास होताना दिसत नाही. सरकारच्या योजना असोत किंवा इतर काही गोष्टींची माहिती समाजापर्यंत पोहचत नाहीत. त्यामुळे शासनाच्या योजनांचा लाभ समाजातील गरीब कुटुंब तसेच होतकरू विद्यार्थ्यांना मिळत नसल्याचे दिसून येत आहे. आपल्या समाजातील खूप लोक मोठमोठ्या शासकीय अधिकारी तसेच राजकीय पदावर विराजमान आहेत.पण समाजाच्या कल्याणासाठी पुढाकार घेण्याची त्यांची मानसिकता होत नाही.ही मानसिकता बदलून समाजाच्या भल्यासाठी सर्वांनी पुढे येणे आवश्यक आहे.काही लोकं रोहिदास आणि रविदास असा भेदभाव करून समाजामध्ये भांडण लावून दुफळी निर्माण करत आहेत.हा वाद मिटवून सर्वांनी एकजुटीने समाजाच्या न्यायहक्कांसाठी एकत्र येणे गरजेचे आहे. हे एकत्रीकरण घडवण्यासाठी व चर्चेकरिता भारतीय चर्मकार समाज,महाराष्ट्र राज्याध्यक्ष पंढरीनाथ चव्हाण यांच्या उपस्थितीत रत्नागिरी जिल्ह्यातील प्रत्येक तालुका स्तरावर बैठकी घेण्याचा निर्णय घेत आहोत. या बैठकीला  समाजातील सर्व माता-पिता, बंधू-बघिणी यांनी सहकार्य करावे. अधिक माहितीसाठी संपर्क असे आवाहन संजय निवळकर यांनी केले आहे.



........................................

२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256  / 9529501121


Comments