ऑस्करच्या अंतिम यादीत... प्रियंका चोप्राचा 'द व्हाइट टायगर' चित्रपट


 मुंबईः अरविंद अडीगाच्या आंतरराष्ट्रीय स्तरावर लोकप्रिय कादंबरीवर आधारित नेटफ्लिक्सच्या 'द व्हाईट टायगर'ने अडॉप्टेड स्क्रीनप्ले प्रकारातील 93व्या ऑस्कर पुरस्कारांच्या अंतिम यादीमध्ये स्थान मिळवले आहे. प्रियंका चोप्राने या चित्रपटात सहाय्यक अभिनेत्री म्हणून काम केलं आहे. सोबतचं ती या चित्रपटाच्या कार्यकारी निर्मात्यांपैकी एक आहे.


'द व्हाइट टायगर'ला ऑस्करच्या अंतिम यादीत नामांकन मिळाल्याबद्दल प्रियंका चोप्राने लिहलंय की, "नुकताच आम्हाला ऑस्करसाठी नामांकन मिळालं आहे! रामिन आणि टीम व्हाईट टायगरचे अभिनंदन. मी स्वतःहून नॉमिनेशनची घोषणा करत असल्याने हे अधिक खास बनले आहे. मला खूप अभिमान वाटतो."

रामिन बहरानी यांनी लेखक अरविंद अडीगा यांचं पुस्तक केवळ चित्रपटासाठी अडॉप्ट केलं नाही तर त्यांनी स्वत: चित्रपटाचे दिग्दर्शनही केलं आहे.

अभिनेता आदर्श गौरवला ब्रिटिश अ‍ॅकॅडमी ऑफ फिल्म अॅण्ड टेलिव्हिजन आर्ट्स (BAFTA) पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट अभिनेत्यासाठी 'द व्हाइट टायगर' मधील उत्तम अभिनयासाठी नामांकन मिळाले होते. 


...............................
2.5 लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन प्रिंट मीडिया
.......................................
सत्यमेव जयते
24x7 
www.freshnewz.in
freshnewskop24@gmail.com

Freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
.......................................
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी    पत्रकार होण्यासाठी  कॉल करा 

9529501121


Comments